Home मुंबई *शहीद वसंत व रजब स्मृती निमित्त मूलभूत अधिकार संघर्ष समिती ची ‘धार्मिक...

*शहीद वसंत व रजब स्मृती निमित्त मूलभूत अधिकार संघर्ष समिती ची ‘धार्मिक सलोखा परिषद!’

290
0

* वसंत व रजब या दोन गांधीवादी मित्रांच्या हौतात्म्याच्या स्मृती निमिंत्त मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) ने ‘धार्मिक सलोखा परिषद’ १९ जुलै २०२५ रोजी मुंबईत जनता केंद्र, तुळशीवाडी पोस्ट ऑफिस जवळ, ताडदेव, मुंबई सेंट्रल (प) येथे दुपारी ४.३० वाजता आयोजित केली आहे.

महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्यात १८ रचनात्मक कार्यक्रम दिले. त्यातील एक महत्वाचे कलम होते कौमी एकता. वसंत हेगिश्टे व रजब अली लाखाणी हे दोन गांधी विचारांचे मित्र हिंदू मुस्लिम दंगल थांबविण्याच्या प्रयत्नात १९४६ साली अहमदाबाद येथे मारले गेले. शहीद झाले. आपल्या स्वातंत्र्य आंदोलनातील ही दिपविणारी घटना आहे. आपल्या स्वातंत्र्य आंदोलनाचा हा दैदित्यमान वारसा तरुणां पर्यंत पोहचविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

परिषदेचे प्रमुख वक्ता लेखक व पत्रकार चंद्रकांत झटाले असून. महाराष्ट्र् प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. या परिषदेला मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मूलभूत अधिकार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले ,.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here