*पराभव दिसतं असल्यान भाजपा हिंदू- मुस्लिम वाद निर्माण करतेय*
*महाराष्ट्राचा विश्वासू चेहरा उद्धव ठाकरे*
*बलात्कारी रेमन्नाची जागा जर्मनी नाही, भर चौकात फाशी द्या*
*गावागावात वाद निर्माण करणाऱ्याला मतदान करणार का ?*
*छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी गल्लेबोरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सभा संपन्न*
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आ आदित्य ठाकरे यांच्या
दौऱ्याचं आयोजन, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघाचे मविआ उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ करण्यात आलं होतं . यावेळी गल्लेबोरगाव येथे प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली . या वेळी शिवसेना नेते अंबादास दानवे, आ उदय राजपूत, वरूण सरदेसाई, आपचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, राष्ट्रवादीचे विलास चव्हाण यांच्यासह मविआचे पदाधिकारी, कार्यकर्ते-शिवसैनिक उपस्थित होते .
यावेळी आपल्या देशाला, महाराष्ट्राला भाजपपासून वाचवण्यासाठी, महाराष्ट्रात पसरलेला अंध:कार दूर करण्यासाठी, मशालीलाच मतदान करण्याचे आवाहन उपस्थित नागरिकांना
आदित्य ठाकरे यांनी केलं .
*पराभव दिसतं असल्याने भाजपा हिंदू मुस्लिम वाद निर्माण करतेय*
छत्रपति संभाजीनगरमधे पार पडलेल्या सभेतून आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या धोरणी राजकारणावर सडकून टीका केली . यावेळी बोलताना ‘देशभरातील वातावरण पाहता ४ तारखेला देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे . अबकी बार ४०० पार म्हणतात, पण २०० पार जाणार नाहीत . मिंदे सरकावाले येथे फिरतील . काही मतदार सरपंचांना धमकावल जातेय, पराभव दिसायला लागल्याने भाजप हिंदू- मुस्लिम वाद निर्माण करतेय. जिथे-जिथे पराभव दिसायला लागला तिथे भाजप वेगवेगळ्या मार्गाने वाद निर्माण करतेय’. असे ते म्हणाले
*महाराष्ट्रचा विश्वासू चेहरा उद्धव ठाकरे*
राज्यातील जनता उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे . काही राज्यात अजूनही उमेदवार मिळत नसल्याचे चित्र आहे . महाराष्ट्रात सर्वात विश्वासू चेहरा उद्धव ठाकरे यांचा आहे . कारण महाराष्ट्रात जे काही झालं ते देवेंद्र फडणवीसांनी केलं असेल, पण आपल्यातील डरपोक लोक पळाले. भाजपला एवढं काही करून काय मिळालं ? मूळ भाजपचे लोक म्हणतात आम्हाला काहीच मिळाले नाही . त्यात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेण्यात आले . भाजपवाले आपल्या डोक्यावर बसल्यास ते आपले सर्व उद्योग गुजरातला घेऊन जातील . आपलं मंत्रालय देखील गुजरातला घेऊन जातील . त्यात मिंदे सरकार बदल्यासाठी बोली लावतायत . आणि हे चित्र बदलायचं असेल तर मविआला मतदान करावे लागेल’. असं म्हणत जनतेला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केलं .
*बलात्कारी रेमन्नाची जागा जर्मनी नाही, भर चौकात फाशी द्या*
बलात्कारी रेमन्नाची जागा जर्मनी नसून त्याला भर चौकात फासावर लटकवले पाहिजे . अत्याचारचा आरोप झाल्यावर मंत्र्याला उद्धव ठाकरे यांनी पदावरून काढून टाकले होते , त्याच मंत्र्याला यांनी त्याला मंत्रिपद दिले – आदित्य ठाकरे
*गावागावत वाद निर्माण करणाऱ्याला मतदान करणार का ?*
भाजपच्या तानाशाही वृत्तीवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘भाजपा आता तानाशाही लोकांची झाली आहे, गॅसचे दर 400 पार गेले नागरिकांना जगणं परवडत नसून, हेच भाजपच्या राज्यात अच्छे दिन आले आहेत का ? 15 लाख कुणाच्या खात्यात आले आहेत का? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? तर तसं झालं नाही . उद्या भाजप तुमच्या घरात सीसीटीव्ही लावून तुम्ही काय खायचं आणि काय नाही खायचं याबाबत बोलतील . आता सर्वांचं आरक्षण त्यांना काढून टाकायचंय, यांना संविधान बदलायचं आहे . भाजपला स्वतःचे संविधान लिहायचं आहे आणि समोर जे गद्दार आहेत , त्यांनी एकाच कामात कमिशन घेतलं नाही . त्यांनी स्पीड ब्रेकच्या कामात कमिशन घेतलं नाही . दारूच्या दुकानासमोर ब्रेकर लावले . त्यामुळे गावागावात वाद निर्माण करणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान करणार आहेत का ? असा सवाल उपस्थित जनतेला आदित्य ठाकरेंनी केला.





















