Home आरोग्य / पर्यावरण पावसाच्या पाण्याने केली,पालिकेच्या रस्ते कामाची पोल खोल.. साचणाऱ्या पाण्यामुळे, वाहतुकीची कोंडी,...

पावसाच्या पाण्याने केली,पालिकेच्या रस्ते कामाची पोल खोल.. साचणाऱ्या पाण्यामुळे, वाहतुकीची कोंडी, वाहन चालकांसह प्रवाशांचे हाल…

118
0

कांदिवली वार्ताहर

अनिल चासकर

कांदिवली विभागात पावसाळ्यात महत्वाच्या मार्गांवर, सखल भागात पाणी साचते. साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. वाहन चालक आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. साचणाऱ्या पाण्यामुळे पालिकेच्या कामातील भोंगळपणा उघडा पडलाआहे.

पालिकेने पाणी साचणाऱ्या भागात योग्य उपाय योजना करून, वाहन चालकांसह प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी वाहन चालकांमध्ये जोर धरू लागली आहे.

पालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात रस्ते, पदपथ, गटारे आदी कामे करण्यात आली.यां कामा दरम्यान सातत्याने वाहतुकीची कोंडी होऊन, वाहन चालकांसह प्रवाशांनी प्रचंड मनस्ताप सहन केला. आयुक्तानी दिलेली डेड लाईन
उलटूनही कामे सुरूच होती.

ठेकेदारांनी कामे पूर्ण करण्यासाठी कामात केलेला हलगर्जी पणा पावसात साचणाऱ्या पाण्यामुळे दिसून येतं आहे. कांदिवली पूर्वेला दृत गती मार्गाहून ठाकूर कॉम्पलेक्स कडे जाणारा मार्ग, आकुर्ली यां मुख्य मार्गाहून बोरिवली कडे जाणाऱ्या मार्गाच्या कोपऱ्यावर, कांदिवली पश्चिमेला, पोंईसर भुयारी मार्गात तसेच जिमखाण्याकडे जाणाऱ्या सिग्नल चौका पूर्वी स्वामी विवेकानंद मार्गावर आणि निर्मल कॉलेज समोर महात्मा गांधी मार्गांवर पाणी साचते. पाऊस उघडल्या नंतर हि उपरोक्त भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते.यामुळे रस्त्यांचे काँक्रिटी करण करून देखील वाहन चालकांसह प्रवाशांना विशेषतः दुचाकी आणि तीन चाकी वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here