Home जालना / परभणी / बीड / लातूर / हिंगोली / नांदेड / उस्मानाबाद *लातूरमधील शेतकरी बैलाऐवजी स्वत: जोताला जुंपून घेतोय,क्लिप ३०जुनला वायरल झाली आणि कृषी...

*लातूरमधील शेतकरी बैलाऐवजी स्वत: जोताला जुंपून घेतोय,क्लिप ३०जुनला वायरल झाली आणि कृषी अधिकारी गतीमान झाले*

74
0

क्लिप ३०जुनला वायरल झाली आणि कृषी अधिकारी गतीमान झाले*

*बळीराजाला पुर्ण सहकार्य वेळीच का मिळत नाही?*
*पिएम किसान योजनेचे लाभार्थी असलेला शेतकरी सुविधा मदतीपासून वंचित का?*

*गाव तालुका जिल्हा पातळीवरील अधिकारी नक्की करतात काय?*
असे प्रश्न उभे रहातात. *तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी बळीराजा ला किती व कसे सहकार्य करतात ? यावरही काम होण्याची गरज आहे.*

*कृषीमंत्र्यांकडून महाराष्ट्र विधान परिषद नियम २६० अन्वये प्रस्तावावरील चर्चेला दिलेले उत्तरात या बाबत पुढील माहिती देण्यात आली आहे.*

अंबादास गोविंद पवार (फार्मर आयडी-४५०६९५२२७१४) यांच्‍या नावे ०.८७ हे. कोरडवाहू शेती असून त्‍यांची पत्‍नी सौ. मुक्‍ताबाई अंबादास पवार (फार्मर आयडी-४०४०४००६२९४) यांचे नावे ०.८९ हे. कोरडवाहू शेती असून बाबुराव गोविंद पवार यांची १.६० हे. जमीन कसत असताना त्‍यामध्‍ये सोयाबीन+तूर (१ हे.) असून कापूस ०.६० हे. कोळपणी करतानाची व्हिडीओ क्लिप दि. ३०/०६/२०२५ रोजी व्‍हायरल झाली.
दि.०१/०७/२०२५ रोजी तालुका कृषी अधिकारी अहमदपूर, मंडळ कृषी अधिकारी शिरूर ताजबंद, सहाय्यक कृषी अधिकारी हडोळती आणि आत्‍मा यंत्रणेचे तालुका तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापक व सहाय्यक तालुका तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापक यांनी अंबादास पवार यांची घरी भेट घेऊन त्‍यांच्‍या मागणीनुसार ०१ बॅग डीएपी खत, १० किलो बायोफर्टिलायझर व तूर मिनीकिट बियाणे ०४ किलो अशी तातडीची मदत केली.
तसेच दि. ०२/०७/२०२५ रोजी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी लातूर व तालुका कृषी अधिकारी अहमदपूर यांनी भेट घेतली व त्‍यांच्‍या मागणीनुसार *मनुष्‍यचलित कोळपणी यंत्र* *उपलब्‍ध करून देणेबाबत आश्‍वासित* केले.
दि.०४/०७/२०२५ रोजी विभागीय कृषी सहसंचालक, विभाग लातूर यांचे उपस्थितीत *मनुष्‍यचलित सायकल कोळपे शेतक-यांना उपलब्‍ध करून दिले*. तसेच *बैलाच्‍या मदतीने कोळपणी करून देण्‍यात येणार आहे.* अंबादास गोविंद पवार हे पीएम-किसान योजनेचे लाभार्थी आहेत.

*पीकविमाबाबत संक्षिप्त टिप्पणी*

कृषीमंत्री महोदयांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम २६० अन्वये प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना राज्याने 1 हजार १५ कोटी अजून पीक विम्याचे भरले नाही म्हणून विमा कंपन्यानी शेतकऱ्यांना पैसे दिले नाही, असे स्पष्ट केले होते. असे जरी असलेतरी याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविलेला आहे. त्यास मंजूरी मिळाल्यानंतर कृषी विभागाकडून लवकरात लवकर याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे सरकार राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here