Home मुंबई *”पहलगाममध्ये गोळ्या, आणि मुंबईत मराठी माणसावर आरोप? – एड अमोल मातेले

*”पहलगाममध्ये गोळ्या, आणि मुंबईत मराठी माणसावर आरोप? – एड अमोल मातेले

83
0

मंत्रीपद गेलं तरी हरकत नाही, पण मराठीपण गमावलं तर तुम्ही शून्यात जाल, श्रीमान शेलार!”*

मुंबई:
मराठी भाषा, मराठी अस्मिता, आणि मातृभाषेसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची थेट पहलगाममधील अतिरेकी गोळीबाराशी तुलना करणे म्हणजे आशिष शेलार यांनी पातळी सोडली आहे की पातळीच उरलेली नाही हे ठरवणं कठीण झालं आहे. महाराष्ट्र आणि मराठी समाजाच्या इतिहासात आजचा दिवस काळा ठरावा, असं वागणं भाजपच्या मंत्र्यांनी केलं आहे.

शेलार साहेब, पहलगाममध्ये अतिरेक्यांनी धर्माच्या नावावर गोळ्या झाडल्या, पण इथे मनसेसारख्या पक्षाने फक्त ‘मराठी भाषा का नाही?’ असं विचारलं – आणि तुमच्या तोंडातून यालाच अतिरेकी प्रवृत्तीची उपमा?
हे वक्तव्य म्हणजे केवळ मनसेचा नव्हे, तर संपूर्ण मराठी जनतेचा, त्यांच्या अस्मितेचा आणि मातृभाषेच्या लढ्याचा अपमान आहे.

स.खा. पाटलांची आठवण आलीच!संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जेव्हा मुंबई महाराष्ट्रात यावी की नाही यावर संघर्ष सुरू होता, तेव्हा काही नतद्रष्टांनी महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतली होती. त्या काळात स.खा. पाटलांनी जे केलं, तेच आज आशिष शेलार करत आहेत. फक्त फरक एवढाच — त्या वेळी टोप्या होत्या, आज कोट-टाय आहे.

आमच्या मागण्या आणि प्रश्न स्पष्ट आहेत.मराठी भाषेचा अपमान सहन करणार का? हे राज्य आमचं आहे, इथं आम्हाला आमच्या भाषेत काम मिळालं पाहिजे, व्यवहार झाला पाहिजे – एवढं सांगितल्यावर अतिरेक्याची उपमा?
तुम्ही कोणाच्या दबावाखाली आहात? दिल्लीच्या? की कुठल्या कॉर्पोरेटच्या?

शेलार साहेब, लाज वाटली पाहिजे!
तुम्ही एकीकडे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणता, आणि दुसरीकडे हिंदूंच्या मातृभाषेचा अपमान करणाऱ्यांच्या रांगेत उभं राहता.
शब्द सुशोभित असले तरी विचार वाकडाच आहे.

ज्या भूमीत ज्ञानेश्वर, तुकाराम, सावित्रीबाई, फुले, शाहू, आंबेडकर यांनी मातृभाषेचं मूल्य सांगितलं, तिथं ‘मराठी बोलणाऱ्यांना’ अतिरेकी म्हणणं म्हणजे संस्कृतीवरच घाला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा स्पष्ट इशारा मराठीचा अपमान करणाऱ्या कोणत्याही नेत्याला जनतेने वेशीला टांगले आहे आणि टांगत राहील!
हे आंदोलन फक्त मनसेचं नाही, हे सगळ्या मराठी मनाचं आहे. आम्ही विचारतोय तुमचं मन मराठी आहे का मनी दिल्लीची मर्जी आहे?

जय जिजाऊ | जय महाराष्ट्र | माय मराठीला अभिवादन!

एड अमोल मातेले, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here