*असावरी जगदाळेला पीएमसीमध्ये नोकरी द्यावी!
सुरक्षा ही सरकारची जबाबदारी*
*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे*
पुणे दि.13 जून
जम्मू कश्मीर मधील पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात ज्या लोकांना जीव गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना नोकरी द्यावी. आसावरी जगदाळेची नोकरी पक्की करावी. अशी मागणी करण्यात आली होती. त्यांनी ही मागणी मान्य केली. जगदाळे कुटुंबाला आधार दिला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार आहे. आसावरीची नोकरी पुण्यात असावी. पीएमसीमध्ये असावरीला नोकरी द्यावी,पहलगाम मधील या घटनेला आता सहा ते सात आठवडे होऊन गेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या कुटुंबीयांना सरकारी नोकरी द्यावी असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, राज्य सरकारने दिलेला शब्द पाळावा. गंगाधाम चौकात अपघात झाला. रस्त्याची कामे लवकर पूर्ण करा. जे प्रभाग पडतील, ते सगळं पारदर्शक व्हावे. फॉर्म्युला सर्व राज्याला लागू असावा. वाड्याची अवस्था बिकट आहे. अनेक प्रकल्प रखडले आहेत. खडकवासला धरणातील प्रदूषणावर लक्ष घालावं, सरकारला याबाबत सांगितलं आहे. वाहतूक कोंडी देखील महत्त्वाचा मुद्दा आहे, यावर मार्ग काढावा. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, रस्त्यावरील सुरक्षा महत्त्वाची आहे. पुण्यात नवं टर्मिनल झालं आणि पहिल्या पावसात ते तुंबलं, असं कसं याची चौकशी व्हावी? इन्फ्रास्ट्रक्चर होत आहेत, पण सुरक्षेचे काय? पब्लिक ट्रान्सफर हा विषय योग्य हाताळायला हवा. पब्लिक ट्रान्सफर सुरक्षित असलं पाहिजे. सगळ्या बाबतीत बेसिक सेफ्टी पाहिजे. आजच्या बैठकीत पाण्याची, रस्त्याची या सगळ्यांवर चर्चा झाली. प्री मॉन्सून काय तयारी आहे? याचा आढावा घेतला. पालखीच्या तयारीसासाठी देखील चर्चा झाली, असेही सुप्रिया सुळे यांनी बोलताना म्हटलं आहे.पु
ढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, आता रिपोर्टची वाट बघावी लागेल. येणाऱ्या अधिवेशनात पहलगाम आणि यावर डिटेल्स चर्चा करावी, अशी मागणी करू. सुरक्षा ही सरकारची जबाबदारी असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी सागितले.


















