Home Trending Now श्रीसिद्धीविनायक मंदिर परिसरात नारळ आणण्यास मनाई तसेच रविवार, दि. ११ मे २०२५...

श्रीसिद्धीविनायक मंदिर परिसरात नारळ आणण्यास मनाई तसेच रविवार, दि. ११ मे २०२५ पासून श्री ना फुले, हार, मिठाई इ. अर्पण करण्यास तात्पुरत्या स्वरुपात मनाई! मात्र दुर्वा व जास्वंद फुले याला अपवाद!

317
0

जम्मू व काश्मीर मधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील धार्मिक स्थळे ही हाय अलर्टवर असून श्रीसिध्दिविनायक मंदिरास धोका असल्याबाबतचे इनपुट प्राप्त झाल्याचे
सुरक्षायंत्रणांनी मंदिरास अवगत केले आहे.
या पार्श्वभूमीवर मंदिराच्या सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासंदर्भात
न्यासाचे अध्यक्ष,सदानंद सरवणकर, राज्यमंत्री दर्जा यांच्या
अध्यक्षतेखाली दि. ८ मे, २०२५ रोजी आयोजित केलेल्या न्यास व्यवस्थापन
समितीच्या बैठकीत मंदिर परिसरात नारळ आणण्यास मनाई करण्याचा तसेच रविवार, दि. ११ मे २०२५ पासून श्री ना फुले, हार, मिठाई इ. अर्पण
करण्यास तात्पुरत्या स्वरूपात मनाई करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात
आलेला आहे. तथापि दुर्वांची जूडी, जास्वंदीच फूल आणण्यास प्रत्यवाह नाही.
त्यास अनुसरून याबाबत सहकार्य करण्याचे भाविकांना आवाहन करण्यात येत आहे.
तसेच मंदिर परिसरातील फुलविक्रेत्या संघटनेच्या प्रतिनिधीशी चर्चाकरण्यात आली. त्यांनी देखील देशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.अशी माहिती कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी ंदिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here