Home मुंबई *त्या ७२ तासात झालेल्या मुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतरच आज मजबूत राज्याची मुहूर्तमेढ रोवली...

*त्या ७२ तासात झालेल्या मुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतरच आज मजबूत राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली – देवेंद्र फडणवीस*

169
0

*त्या ७२ तासात झालेल्या मुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतरच आज मजबूत राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली – देवेंद्र फडणवीस*

*महाराष्ट्राच्या विविध छटा एकाच ठिकाणी पहाता येतील असे आयोजन…*

*’मिनी महाराष्ट्र’ साकारल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे केले कौतुक…*

 

*१ मे हा महाराष्ट्राचा सण असून दरवर्षी हा सण आम्ही साजरा करणार -अजित पवार*

मुंबई दि. ३ मे – मी दोन वेळा मुख्यमंत्री झालो नाही तर तीन वेळा झालो त्यात सर्वात कमी तासांचा मुख्यमंत्री आणि अजित पवार हेही कमी तासांचे उपमुख्यमंत्री असा आमचा रेकॉर्ड झाला आहे. पण आज जे मजबूत राज्य दिसतेय त्याची त्या ७२ तासातच मुहूर्तमेढ रोवली गेली होती अशी स्पष्ट कबुली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या कार्यक्रमात दिली.

आज गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५ च्या तिसर्‍या दिवसाच्या कार्यक्रमात राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला.

 

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाला सर्वच माजी मुख्यमंत्री आले असते तर बरे झाले असते. हा राजकीय मंच नव्हता तर हा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव होता मात्र आज जे आले त्यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसने आमचा सन्मान केला त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी धन्यवाद दिले.

 

अतिशय सुंदर असा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केला आहे. महाराष्ट्राच्या विविध छटा एकाच ठिकाणी पहाता येतील असे आयोजन करण्यात आले आहे. इतकी सुंदर दालने आहेत की, प्रत्येक तरुण पिढीने ती पाहिली पाहिजेत. महाराष्ट्र काय आहे हे त्यात पहायला मिळत आहे. शक्तीचा आणि भक्तीचा इतिहास आहे, थोर पुरुष आणि महाराष्ट्र रत्न पहायला मिळतात. धावता इतिहास पहाता येईल अशी प्रभावी मांडणी आहे. चित्रकला मूर्ती कला दाखवली आहे. खाद्य संस्कृतीही आहे. मिनी महाराष्ट्र साकारण्याचे काम केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.

या उपक्रमात महाराष्ट्राचा धावता इतिहास सांगितला गेला. स्वातंत्र्योत्तर काळातनंतर संयुक्त महाराष्ट्र करायला लढा द्यावा लागला. त्यावेळी राजकीय परिस्थिती होती त्यामुळे लढा उभारला गेला १०६ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. ही संयुक्त महाराष्ट्राची गाथा, लढा नवीन पिढीला माहित नाही हा उपक्रम पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयातही असा उपक्रम ठेवावा असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.

६५ वर्षात झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान हे चांगले आयोजन आहे. सिंहावलोकन केले तर काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले त्या सर्वांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत वाटा उचलला आहे. अशा नेत्यांचा सन्मान व्हावा अशा माध्यमातून हा सत्कार आयोजित केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले.

*१ मे हा महाराष्ट्राचा सण असून दरवर्षी हा सण आम्ही साजरा करणार -अजित पवार*

१ मे हा महाराष्ट्राचा सण असून
दरवर्षी हा सण आम्ही साजरा करणार आहोत. त्यात काही सूचना आल्या आहेत त्याचा विचार केला जाणार आहे. आज जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यात कोणतेही पक्षीय राजकारण नव्हते असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी केला.

राज्याच्या अनेक विभागांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली मात्र उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाची संधी कधी मिळाली नाही. २००४ मध्ये मिळाली होती पण काय झालं त्याची माहिती प्रफुल पटेल यांना माहीत असेही अजितदादा पवार यावेळी म्हणाले.

राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते परंतु सुसंस्कृत राजकारण कसे असते हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी शिकवले आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

 

आपलं सरकार जनतेचे असून जनतेची कामे करत राहू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

 

उद्याचा महाराष्ट्र घडत असताना शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारावर ठाम रहात आणि त्या विचारांची नाळ कायम ठेवत आम्ही आज सत्तेत सहभागी झालो आहोत. गतिमान प्रशासनाची भक्कमपणे साथ देणारे केंद्रसरकार असावे यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. याशिवाय गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५ चे आयोजन का करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कशी उभी राहिली याची माहिती दिली.

 

या कार्यक्रमात सन्मानमूर्ती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपले विचार मांडले.

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५ चा आज तिसरा दिवस असून या कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्रानंतर ६५ वर्षात आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण यांचाही दादांनी सन्मान केला. तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सन्मान स्वीकारला.

 

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले आदींसह पक्षाचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here