Home मुंबई महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण...

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण संपन्न* *जातनिहाय जनगणनेची आमची मागणी, उशीराने का होईना पण सरकारने दखल घेतली*-खा सुप्रिया सुळे

175
0

*महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण संपन्न*

*जातनिहाय जनगणनेची आमची मागणी, उशीराने का होईना पण सरकारने दखल घेतली*

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे*

मुंबई दि.1 मे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालय येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, मुंबई अध्यक्षा राखीताई जाधव, माजी आमदार विद्याताई चव्हाण, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, महेश तपासे, निलेश भोसले, महेश चव्हाण, ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर, सेवा दलचे गिरीश सावंत तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यात 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. हा तोच दिवस आहे, जेव्हा ६४ वर्षांपूर्वी महाराष्ट्र गुजरातपासून वेगळे होऊन स्वतंत्र राज्य बनले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढा करिता १०१ हुतात्म्य बलिदान दिले. आज ६५ व्या महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक येथे सुप्रियाताई सुळे यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी बोलताना सुप्रियाताई सुळे यांनी समस्त महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. ६५ वर्षांपूर्वी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलमय कलश महाराष्ट्रात आणला. या भव्य कार्यक्रमाला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याची दिशा कशी असावी याची जबाबदारी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी घेतली चव्हाण साहेबांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात मोठी क्रांती घडली. सामाजिक ,राजकीय ,आर्थिक प्रश्न सोडवण्याची ताकत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये होती. तोच विश्वास महाराष्ट्रातील मायबाप जनतेने यशवंतराव चव्हाण यांच्यावर टाकला होता. चीन आणि भारताचे युद्ध ज्यावेळी झालं. तेव्हा जेव्हा हिमालय अडचणीत आला तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला. चीन आणि भारत युद्ध झाल्यानंतर जी परिस्थिती झाली त्यातून सावरण्याच काम जर कुणी केलं असेल तर ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी केले आहे. असे सुप्रियाताई सुळे यावेळी म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आज महाराष्ट्र दिन साजरा करत असताना महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, शिक्षण, शेतकरी, पाणी या विषयांवर गांभीर्याने विचार करायला हवा. सरकारकडून माझ्या अपेक्षा नाही. सगळ्या महिलांच्या अश्रूवर या सरकारचा महाल उभा आहे. त्यामुळे कोणीतरी त्यांना जाब विचारल पाहिजे. त्याची जबाबदारी आपल्यावरही आहे. कारण लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मतदान केले आहे. पक्षावर विश्वात दाखवला आहे. जून महिन्यापासून संपूर्ण राज्याचा दौरा मी करणार आहे. असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले.

सुप्रियाताई सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, जातीय जनगणनाची मागणी आपण केली होती. ती उशिरा का होईना केंद्र सरकारने मान्य केली. त्याचे मी मनापासून स्वागत करते. संसदेत महिला आरक्षणाच्या बिल आम्ही संमत केले आहे. सर्व गोष्टी २०२५- २६ पर्यंत पूर्ण करण्याची गरज आहे. २०२९ मधील लोकसभा निवडणुकीसाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. आता महिला आरक्षण विधेयकाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मे महिन्यात वन नेशन वन इलेक्शनसह इन्कम टॅक्स नवीन कायदा होत आहे. या दोन्ही समितीवर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

यावर सविस्तर बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, जम्मू कश्मीर मधील पहलगामवरचा हल्ला हा देशावरचा हल्ला आहे. पहलगाम हल्ल्याबद्दल प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कोणतीही विरोधी भूमिका घेणार नाही. आम्ही सरकारला याबाबत शब्द दिला आहे. टीका करायला भरपूर संधी आहे. संसदेत या विषयावर ताकदीने बोलेल. पण आता आठ ते दहा दिवस अत्यंत जपून व्यक्त करणार आहे. संसदेत सर्व पक्षांना एकत्र बोलवा. त्यानंतर जगाला आम्ही एक आहोत, असा संदेश देण्याची विनंती सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here