Home राजकीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत – डॉ.नीलम गोऱ्हे

146
0

देशाचा व राज्याचा विकास, अस्मिता याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करत असून ते काम राज्यात पुढे नेण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत… डॉ.नीलम गोऱ्हे

केंद्रीय राज्यमंत्री खा.कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत त्या बोलत होत्या.

देशाचा व राज्याचा विकास, अस्मिता याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करत असून ते काम राज्यात पुढे नेण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. त्याचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. यासाठी आपण काम करायचे आहे असे आवाहन शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी, कशेळी येथें शिवसेना भिवंडी लोकसभा मतदार संघातील खा.कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित केला होता त्यावेळी त्या बोलत होत्या.

संवेदनशील मुख्यमंत्री हे आपल्याला लाभलेले आहेत हे आपल्याला नाकारता येणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद ठाणे जिल्ह्यावर कायम राहिला आहे. महायुती ही देशाच्या रक्षणासाठी आहे. ठाणे व भिवंडी आपल्याला विश्वासला साथ देणारे नेते हे शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे आहेत. त्याचबरोबर खा. श्रीकांत शिंदे यांचे येथे संपूर्ण लक्ष असून ठाणे जिल्ह्याच्या विकासात त्याचा मोठा वाटा असल्याचा विश्वास डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूक म्हणजे एक प्रकारचा सण आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी जास्तीत जास्त मतदान होईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे आवाहन देखील डॉ.गोऱ्हे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here