Home महाराष्ट्र जि.प. शिक्षण विभागातील सावळ्या गोंधळाची चौकशी करा – कुणबी सेनेची मागणी

जि.प. शिक्षण विभागातील सावळ्या गोंधळाची चौकशी करा – कुणबी सेनेची मागणी

177
0

जि.प. शिक्षण विभागातील सावळ्या गोंधळाची चौकशी करा – कुणबी सेनेची मागणी

३८ कोटीचा निधी परत का गेला,

“दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबित करा” कुणबी सेनेची मागणी

विष्णू कदम/ जालना

जालना जिल्हा परिषद अंतर्गत शासकीय व खाजगी शाळांमध्ये शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी तर काही ठिकाणी शिक्षक दारू पिऊन कामकाज करत असल्याच्या अनेक लेखी तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या त्यातच बऱ्याच शाळेत दारू पिणाऱ्या शिक्षकांविरुद्ध गावकऱ्यांनी आंदोलनेही केली. जि. प. च्या शिक्षण विभागात पदमान्यता, संचमान्यता मिळवण्यासाठी, शिक्षण संस्थेतील व शिक्षण विभागातील भ्रष्टाचार दडपण्यासाठी लाखो रुपयांचा गैरव्यवहार बेकायदेशीर कारभार शिक्षण विभागात चालू असून या विभागात आंधळे दळतय कुत्र पीठ खातय असा सावळा गोंधळ बऱ्याच दिवसापासून

चालू असल्याच्या तक्रारीही गावकऱ्यांनी केल्या होत्या, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आलेला ३८ कोटीचा निधी परत का गेला ? अशा भ्रष्ट दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी कुणबी सेनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडे करण्यात आली आहे.

जालना जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागात गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. शिक्षण अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनागोंदी कारभार सुरू आहे या भ्रष्ट कारभाराच्या विरुद्ध बऱ्याच दिवसांपासून शिक्षक संघटनेचे मोर्चा, सामाजिक संघटनेचे धरणे, आंदोलने जिल्हा परिषदेच्या समोर वेळोवेळी सुरूच आहे.

सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी आपला अमूल्य वेळ देऊन शिक्षण विभागाला चांगले धारेवर धरले होते. मात्र कुठल्याही लोकप्रतिनिधीने, सामाजिक संघटनेने ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत विशेष लक्ष दिले नाही. पर्यायाने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले शिक्षण व क्रीडा विभागाने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी  ३८ कोटी रुपयांचा निधी दिला मात्र हा निधी परत गेला आहे याची खंत कुणालाही नाही, दुःखही नाही, खेदही नाही.

शिक्षण व क्रीडा विभागाने ९ सप्टेंबर २०२२ रोजी जालना जिल्हा परिषदेला ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ३८ कोटी रुपयांचा निधी दिला होता मात्र हा निधी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांवर किंवा त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी खर्च न केल्यामुळे तो परत गेला आहे. हा निधी परत का गेला याबाबतची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंध शिक्षणाधिकारी संबंधित अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी केली आहे .संबंधित अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आलेला हा निधी परत जाणे म्हणजे शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. असा किती निधी शिक्षणविभागाचा परत गेला आहे त्याचबरोबर ग्रामीण भागाच्या विकासासाठी आलेल्या निधी परत का व कशासाठी गेला आहे याची सुद्धा चौकशी व्हावी व शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आलेला निधी भ्रष्ट व दोषी अधिकाऱ्यांनी खर्च केला नाही या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्ष भागवत काळे व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here