Home मुंबई हिंदू सणा बद्दल राज्यसरकारची आपत्ती ?- आदित्य ठाकरे

हिंदू सणा बद्दल राज्यसरकारची आपत्ती ?- आदित्य ठाकरे

148
0

*गणेश मूर्तींच अजून विसर्जन झालेलं नाही, हे मोठं दुर्दैव- आदित्य ठाकरे*

*दि.:- ११ फेब्रुवारी २०२५, मुंबई*

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, मा. आमदार, श्री. आदित्यजी ठाकरे यांची आज मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी गणपती विसर्जनाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही विसर्जनासाठी योग्य पर्याय न काढणे ही सरकारची निष्क्रियता असल्याचा आरोप त्यांनी केला .
“पीओपी मूर्तींसंदर्भात जी समस्या आता निर्माण झाली, ती पुढील गणेशोत्सवातही होणार आहे. विसर्जनाचा नेमका काय पर्याय आहे, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला हवे आहे.” असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं. तसेच शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गणेश मंडळांना पूर्ण पाठिंबा असून, विसर्जन आणि गणेश मूर्तींसंदर्भात सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here