Home मुंबई वाल्मीक कराड तर दाऊदलाही मागे सोडून गेला, कराडने पोलिसांनाच बिळात घातले* ...

वाल्मीक कराड तर दाऊदलाही मागे सोडून गेला, कराडने पोलिसांनाच बिळात घातले* *सोमनाथ सुर्यवंशी यांचा खून झाला, परभणी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु*- जितेंद्र आव्हाड

188
0

*वाल्मीक कराड तर दाऊदलाही मागे सोडून गेला, कराडने पोलिसांनाच बिळात घातले*

*सोमनाथ सुर्यवंशी यांचा खून झाला, परभणी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु*

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड*

मुंबई दि.3 जानेवारी

गुंडांना जात नसते, गुंडांना फक्त आपला स्वार्थ दिसत असतो. वाल्मीक कराडने सीआयडीसमोर येण्यापूर्वी एक व्हिडिओ रिलीज केला होता. तो शरण येणार हे माहीत असून देखील पोलिसांनी नाकाबंदी केली नाही. आज पूर्ण देशात आपल्या पोलिसांची नाचक्की झाली आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, वाल्मीक कराड आरोपी नाही असे कोणी म्हणत असेल तर परळीमध्ये आंधळेच्या हत्येमध्ये हा 307 चा आरोपी आहे. हे पोलिसांना माहीत नव्हते का? पोलिस म्हणजे बिळात लपलेल्या आरोपीला सुद्धा शोधून काढतात, पण इथे तर वाल्मीक कराडने पोलिसांनाच बिळात घातले आणि हा बिळावरून गेला. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. याच्यातले गांभीर्य कमी कसे होईल याच्याकडे राजकीय दृष्टीने बघायला पाहिजे. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी निधन प्रकरणावर कोणीही काहीही बोलायला तयार नाही. ना राज्य सरकार ना महाराष्ट्र पोलीस कोणीच याबद्दल बोलत नाहीत. पोलीस माहिती देण्यास तयार नाही, ना सरकार माहिती द्यायला तयार आहे. पण उद्रेक झाला तर मग आहेच लाठीचार्ज. संविधान जपायचे, पण या संविधान जपण्यासाठी गेलेल्यांची हत्या झाल्यानंतर बघत बसायचे. सोमनाथ सुर्यवंशी यांचा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे. गरीबाची कोणीच बाजू घेण्यासाठी तयार नाही. हे सर्व प्रकरण दडपण्याच्या दिशेने जात आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

मी मुंबईत कॉलेजमध्ये असल्यापासून अनेक गोष्टी बघितल्या. दगडीचाळ असो किंवा इतर अनेक भागातील गुंड मी बघितले. मात्र मुंबई पोलिसांपुढे काय कुणाची हिंमत. त्या काळात दाऊदला कॉलर पकडून भेंडी बाजारमधून खेचून आणायचे. पोलीस हेच सर्वात मोठे दादा असतात, त्यांच्यापुढे कोणीही नाही. असं आमचा समज होता कालपर्यंत. मात्र आज परिस्थिती वेगळी असून वाल्मिकी कराड हा दाऊद, छोटा राजन, अमर नाईक यापेक्षा कोणी मोठा लागून गेला आहे. स्वतः चालत पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे. जेव्हा की ते बापू आंधळे यांच्या हत्येच्या कटात 307 चा आरोपी आहे. पोलिसांना हे माहिती नव्हतं का? आरोपींना आपल्या महाराष्ट्रात अशी वागणूक देणार आहात का? असाच प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ⁠अजित पवार बीडला गेले असताना शिवलिंग मोराळे होता, ⁠ही गाडी अजित पवार यांच्या ताफ्यामध्ये होती. ⁠याच गाडीतुन वाल्मिक कराड याला सोडलं. या प्रकरणामुळे ⁠पोलिसांची नाचक्की पूर्ण देशात झाली आहे. पोलिसांच्या भाषेत शरण आला यात काही अर्थ नाही. ⁠पकडून आणणे महत्वाचं असतं. पोलीस बिळातून शोधून आणत असतात. मात्र या प्रकरणात पोलीस बिळात होते असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सोमनाथ सुर्यवंशी संदर्भात आज ही कोणी बोलायला तयार नाही. हा मर्डर आहे हे कोणीही बोलायला तयार नाही. श्वासोश्वासाने तो मेलेला नाही. ⁠हे प्रकरण दडपण्याच्या दिशेने जात आहे. ⁠पत्रकार यांच्या मागे काही विशेष लोक फिरत आहेत. मी ही वंजारी आहे, ⁠मात्र शितावरून भाताची परिक्षा करु नका. राज्यात ⁠40 हून अधिक आयएस आणि आयपीएस अधिकारी वंजारी समाजाचे असून चांगलं काम करत आहेत. आता धर्माविरुन ते जातीवर आले, त्यानंतर ते पोटजातीवर जातील त्यानंतर भाषेवर जातील असेही जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

मला कराडचं कौतुक याच्यासाठी वाटतं की, मी हे सगळं 1989 सालापासून बघतोय. दाऊद, छोटा राजन, बाबू देशी, अरुण गवळी ही मुंबईतली मोठी नावं आहेत. त्यांची एवढी चालत नाही, एवढी ह्या कराडची चालत आहे. त्याची ताकद काय आहे ते मला माहित नाही. अशी दादागिरी कोणाची चालली नाही, डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या बाहेर दारातच आला. मुंबईमधल्या मोठ्या गँगवारला आख्खी मुंबईची इंडस्ट्रीयल लॉबी घाबरायची. मुंबईच्या पोलिसांवर ते घाबरायचे, पोलीस त्यांना पकडून घेऊन यायचे. एवढी पोलिसांची दादागिरी होती. पण, वाल्मिक कराडची पोलिसांपेक्षा जास्त दादागिरी दिसून आली,असे जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here