बेस्ट उपक्रम वाचवण्यासाठी
*मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांना बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांचे बैठकीसाठी पत्र*
10/12/24 बेस्ट बसचा बेस्टच्या इतिहासातला सर्वात मोठा अपघात झाला सदर अपघाताने 9 निष्पाप मुंबईकर जनतेचे प्राण घेतले तसेच अनेक जण गंभीररित्या जखमी झाले,अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले,बेस्ट मध्ये हा काळा दिवस म्हणून आता पाळला जाईल.
सदर विषय एवढा गंभीर होता की त्यामुळे सर्व मुंबई हादरली आणि बेस्टचे आशिया खंडात असलेले नावाला मोठा कलंक लागला.
ज्या बेस्ट उपक्रमाने अनेक प्रसंगांत लोकांचे जीव वाचवले,उदा.93 ची दंगल,नेहमी प्रमाणे मुंबई मध्ये होणारी अतिवृष्टी,आणि आता 2019 कोरोणा काळ ह्यामुळे नेहमी बेस्टला जगात नाव होऊन पुरस्कार मिळाले आहेत.पण गेल्या चार वर्षात खाजगीकरण झाल्यापासून बेस्ट मध्ये खाजगी कंत्राटदार यांच्या बस चालक आणि वाहक यांनी मोठ्या प्रमाणात जीवघेणी अपघात केले आहेत.सदर अपघाताची जबाबदारी ही मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि बेस्टचे महाव्यवस्थापक यांनी घ्यायला पाहिजे.
गेल्या वर्षभरात मी बेस्ट कामगार सेनेतर्फे जवळपास 11 पत्र दिले सदर पत्राची दखल घेऊन जर महापालिका आयुक्त श्री भूषण गगराणी यांनी घेतली तर हा अपघात झाला नसता.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी बेस्टची जबाबदारी नाकारली म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लेखी पत्र देऊन हे कळवले असून बेस्ट उपक्रम वाचविण्यासाठी आणि मुंबई कर जनतेस सुरक्षित सेवा द्यायची असेल तर आम्ही ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्याकरिता आपल्या दालनात बैठक आयोजित करावी ही विनंती केली आहे.
आयुक्त आम्हाला बैठक मागून देखील देत नाही



















