*भाजपा सरकार आल्या नंतर हिंदुत्व धोक्यात आलं- आदित्य ठाकरे*
*कचरा उचलणं BMCचं कर्तव्य असताना, त्यासाठी मुंबईकरांनी BMC ला ‘युजर फी’ का द्यावी ?*
*SIT केवळ निवडणुकीपुर्त पाऊल, या आधी शिंदेंच्या भ्रष्टाचाराच्या राजवटीला भाजपचा पाठिंबा होता- आदित्य ठाकरे*
*मुंबई, दि.:१४ डिसेंबर
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, मां. आमदार श्री. आदित्यजी ठाकरे यांची आज मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून मुंबई आणि मुंबई पलिकेसंबंधित दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली .
तसेच भाजपचं हिंदुत्व बेगडी आणि नकली हिंदुत्व आहे . भाजपकडून केवळ फक्त निवडणुकीसाठी हिंदुत्व वापरलं जातं. उलट भाजपच सरकार आल्यानंतर हिंदू मंदिर धोक्यात आले . काल सर्वांना माहीत आहे की उद्धव ठाकरे यांनी भाजपाचं नकली हिंदुत्व एक्सपोज केले . नंतर दादरच्या हनुमान मंदिराबाबत रेल्वेने दिलेली नोटीस मागे घेतली . असं आदित्य ठाकरे पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले .

*कचरा उचलणं BMCचं कर्तव्य असताना, त्यासाठी मुंबईकरांनी BMC ला ‘युजर फी’ का द्यावी ?- आदित्य ठाकरे*
बीएमसी आता मुंबईकरांवर रोजचा कचरा उचलण्याकरिता “युजर फी” आकारण्याचा विचार करत आहे. या आधी कधीही असे घडलेले नाही . बीएमसीचे हे कर्तव्य असताना, मुंबईकरांनी ह्या सेवेसाठी पैसे का द्यावे ? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला केला . तसेच आम्ही बीएमसीच्या माध्यमातून अनेक वेळा मुंबईची सेवा केली आहे, पण मुंबईकरांवर कधीही असा आर्थिक बोजा लादला नाही . आता जेव्हा कधी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग आढळतील तेव्हा बीएमसी मुंबईकरांना पैसे देणार का ? गेल्या दोन वर्षांपासून कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत बीएमसी अपयशी ठरली आहे . असंही टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी सोडलं.
*SIT केवळ निवडणुकीपुर्त पाऊल, या आधी शिंदेंच्या भ्रष्टाचाराच्या राजवटीला भाजपचा पाठिंबा होता- आदित्य ठाकरे*
मुंबई महपालिकेच्या रस्ते घोटाळा बाबत गेल्या दोन वर्षांत आदित्य ठाकरे अनेकदा शिंदे सरकारने बीएमसीअंतर्गत केलेले रस्ते घोटाळे पुराव्यांसह उघड केले आहेत . यावेळी बोलताना ते म्हणाले ‘आता भाजपला “एसआयटी” स्थापन करण्याची आठवण झाली आहे. मी १५ जानेवारी २०२३ रोजी हा घोटाळा उघड केला होता. त्यानंतरही सातत्याने हा मुद्दा उपस्थित केला होता. पण तेव्हा भाजपने शिंदे सरकारच्या भ्रष्ट कारभाराला पाठिंबा दिला होता. जर मुख्यमंत्र्यांना खरोखरच नवीन सुरुवात करायची असेल तर ह्या भ्रष्टाचाराचा स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास होणे गरजेचे आहे; त्यामध्ये तत्कालीन घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे आणि मुंबईचे दोन्ही पालक मंत्र्यांचाही समावेश असावा . SIT हे केवळ निवडणुकीपुरते भाजपने उचललेले पाऊल आहे . गेल्या दोन वर्षांत त्यांचाच शिंदेंच्या भ्रष्टाचारी राजवटीला पाठिंबा होता , असं आदित्य ठाकरे म्हणाले .















