खोट बोला पण रेटून बोला हाच म.वि.आ. चा उद्योग… उद्योग मंत्री उदय सामंत
उद्योग विभागाला वारंवार बदनाम करून राज्यातील गुंतवणूक, उद्योग आणि नोकऱ्या पळवून लावण्याचे ‘रिकामे उद्योग’ जे लोकं करत आहेत. अशा लोकांचा योग्य तो बंदोबस्त राज्यातील जनताच करेल
हरीत आणि नवीकरणीय उर्जा क्षेत्रातली ReNew ही कंपनी महाराष्ट्र सोडून गुजरात मध्ये चालल्याच्या वावड्या काही पक्षांनी उडवल्या होत्या.या फेक नॅरेटीव्हला बळी पडत तशा बातम्या ही केल्या गेल्या, मात्र या बातम्या धातांत खोट्या असल्याचं कंपनीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

सध्या ५०० मेगावॅट वीज सप्लाय करणारी ही कंपनी उलट आपली क्षमता वाढवून २००० मेगावॅट करत आहे, तसंच अपस्ट्रीम व्हॅल्यू चेनमध्ये गुंतवणूक करण्याची योजनाही कंपनीने आखली आहे. गुजरात किंवा इतर कोणत्याही राज्यात तत्सम प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करत नसल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. १ लाख कोटींची गुंतवणूक आणि ३० हजार नोकऱ्या निर्माण करण्याबाबत ही कंपनी प्रतिबद्ध आहे.
अशा कंपन्यांना, खोट्या बातम्या पेरून राज्यातून पळवून लावण्याचं षडयंत्र काही लोकांनी आखले आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने लाडकी बहीण योजना बंद करण्याची घोषणा केली होती, यामुळे निर्माण झालेला वाद झाकण्यासाठी अशी नवीन अफवा सोडण्यात आली.
उद्योग विभागाला वारंवार बदनाम करून राज्यातील गुंतवणूक, उद्योग आणि नोकऱ्या पळवून लावण्याचे ‘रिकामे उद्योग’ काही लोकं करत आहेत. अशा लोकांचे नामोनिशाण राजकीय पटलावर राहणार नाही, यांचा योग्य तो बंदोबस्त राज्यातील जनता जरूर करेल



















