Home महाराष्ट्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शरद पवार साहेबांच्या पक्षाचाच व्हावा…. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मुंबईत एल्गार

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शरद पवार साहेबांच्या पक्षाचाच व्हावा…. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मुंबईत एल्गार

154
0

*महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शरद पवार साहेबांच्या पक्षाचाच व्हावा…. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मुंबईत एल्गार*

मुंबई,रविवार दि. १ सप्टेंबर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार मुंबईच्या वतीने रविवारदि. १ सप्टेंबर रोजी घाटकोपर, छत्रपती शिवाजी महाराज चौक (पश्चिम ), मुंबई येथे *युवा संवाद* मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्याला तरुणांचा उदंड प्रतिसाद लाभून ५ ते ६ हजार तरुण-तरुणी उपस्थित होते.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार साहेब यांनी मेळाव्याला उपस्थित तरुणांशी संवाद साधला.

पवार साहेबांनी नेहमीच तरुणांच्या मागण्यांना प्राथमिकता दिली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता त्यावेळी तरुणांच्या आग्रहाखातरच त्यांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला होता, या प्रसंगाची आठवण करून देताना आगामी सरकारमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच व्हावा असा एल्गार पक्षाचे युवकचे मुंबई अध्यक्ष आणि मेळाव्याचे आयोजक ॲड.अमोल मातेले यांनी केला. त्याला उपस्थित तरुणांनी प्रचंड समर्थन दिले.

राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, मुंबई अध्यक्ष राखी जाधव आदी मान्यवर सदर मेळाव्याला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here