Home Trending Now बोरिवली हुन कोकणी माणसांची मडगांव सुसाट

बोरिवली हुन कोकणी माणसांची मडगांव सुसाट

126
0

कमी थांबे दिल्याने, कोकण वासियांमध्ये तीव्र नाराजी

कांदिवली 
अनिल चासकर

बोरिवली येथून कोकणात जाणाऱ्या पहिल्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी, प्रवास करण्यासाठी आणि पाहण्यासाठी कोकणवासियांनी तुफान गर्दी केली होती. गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1 च्या दरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी हिरवा झेंडा फडकावत सिग्नल दिला..कोकणात जाण्यासाठी . बोरिवली हुन पहिली ट्रेन सुटल्याने चाकरमानी कोकणवासियांचा आनंद द्विगुणित झाला.प्रचंड गर्दी करत पियुष गोयल यांना हात दाखवत आभार व्यक्त केले.

कोकण रेल्वे मार्गावर खास कोकणी माणसांसाठी एक कायमची बोरिवलीहुन सुटणारी ट्रेन करावी अशी मागणी उपनगरातील विशेषतः कांदिवलीत बोरिवली आणि मालाड कोकणी वासियांची प्रचंड ईच्छा होती. या मागणी साठी कोकणातील उपनगरामधील मधिल अनेक मंडळे, संस्था यानी नगरसेवक, आमदार आणि खासदार यांच्या पाठपुरावा केला होता.मुंबई उपनगरात राहणाऱ्या कोकणी माणसांसाठी एक नवीन ट्रेन सोडणार असे आश्वासन बोरिवलीचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी निवडणूक प्रचारात दिले होते.ते आश्वासन प्रत्यक्षात साकार झाल्याने, कोकणी माणसांचा उत्साह बोरीवली फलाट वर दिसून आला.
वांद्रे-बोरिवली -मडगाव अशी आठवड्यातून दोनदा ट्रेन आहे.या ट्रेनला चिपळूण, रत्नागिरी, कणकवली. सिंधुदुर्ग , सावंतवाडी, मडगाव इत्यादी थांबे दिले आहेत
ही ट्रेन पुढील आठवड्यापासून दर बुधवार व शुक्रवार सकाळी 6.50 वा वान्द्रे गाडी नं 10115, सुटून सकाळी 7.23 वा बोरीवली येथे येईल. तसेच दर मंगळवार व गुरुवार सकाळी 7.40 वा मडगाव वरुन सुटणार आहे.
ऐन गणपती उत्सवापूर्वी सुरु झालेल्या या ट्रेन मुळे कोकणी माणसांना गणपती सणाला गावी जाण्याची उत्तम व्यवस्था झाली आहे.

बोरिवली -मडगाव ट्रेन ला खेड,संगमेश्वर,आडविली,राजापूर, वैभववाडी, आणि कुडाळ तालुक्यातील लोकांचा विचार झालेला नाही. गोव्यात राहणाऱ्या लोकांचा विचार केला जातो, आमचा विचार होत नाही. अनेक स्टेशनना ट्रेनचे वेळोवेळी थांबे दिले जातात.पण काही स्टेशनचा, थांबे देताना विचार होत नाही.हा सरळ सरळ अन्याय आहे. अशी तीव्र नाराजी ऐकायला मिळत आहे.आम्ही भराभर जमिनी लिहून दिल्या म्हणून रेल्वे झाली… पण,रेल्वेचा आम्हाला तसा फायदा होत नाही अशी प्रतिक्रिया काही कोकणी माणसांकडून व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here