Home संभाजीनगर *पदवी संधी देते, क्षमता सिद्ध करावी लागते — राज्यपाल जिष्णु देव वर्मा*

*पदवी संधी देते, क्षमता सिद्ध करावी लागते — राज्यपाल जिष्णु देव वर्मा*

10
0

*पदवी संधी देते, क्षमता सिद्ध करावी लागते — राज्यपाल जिष्णु देव वर्मा*

छत्रपती संभाजीनगर, ४ नोव्हेंबर — डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६७ वा पदवीदान समारंभ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने पार पडला.

विद्यापीठ नाट्यगृहात सकाळी साडेअकरा वाजता सोहळा झाला. राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा म्हणाले, “पदवी तुम्हाला संधी देते, मात्र क्षमता सिद्ध करावी लागते. विद्यापीठांनी पदवीसोबतच क्षमता विकासावर भर द्यावा.”

“शिक्षण आणि पात्रतेत फरक आहे. पात्रता काय पूर्ण केले हे सांगते, शिक्षण काय करण्यास सक्षम झालो हे सांगते. विद्यापीठ पदवी-केंद्रितकडून क्षमता-केंद्रितकडे गेले पाहिजे,” असे राज्यपाल म्हणाले.

*प्रमुख पाहुणे प्रा. अनिरुद्ध पंडित (कुलगुरू, ICT मुंबई) म्हणाले,* “रोजगार मागणाऱ्यांऐवजी रोजगार देणारे व्हा. AI आणि स्वयंचलित तंत्रज्ञानावर स्वार व्हा. डॉ. आंबेडकर म्हणाले होते — शिक्षण माणसाला निर्भय बनवते.”

*कुलगुरू डॉ. विजय फुलारी म्हणाले,* “गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी हे आमचे ब्रीद आहे. ४० कंपन्यांसोबत MoU, १३० कंपन्यांच्या मुलाखती, ६४४० विद्यार्थ्यांपैकी २७६० जणांना रोजगार मिळाला.”

*यंदा ६७,५५९ विद्यार्थ्यांना पदवी —* ३३४ जणांना पीएचडी (मानव्य — १३१, विज्ञान — १२४, वाणिज्य — ३१, आंतरविद्या — ४८). ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ चे १०,३३१ आणि मार्च-एप्रिल २०२६ चे ५५,२५५ विद्यार्थी.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. संजय कवडे यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित होते.

—
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here