Home मुंबई *एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार दिवाळी भेट; महागाई भत्ता ६० टक्क्यांवर*

*एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार दिवाळी भेट; महागाई भत्ता ६० टक्क्यांवर*

10
0

*एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार दिवाळी भेट; महागाई भत्ता ६० टक्क्यांवर*

मुंबई, ५ नोव्हेंबर — एसटीच्या ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे. परिवहन मंत्री तथा एसटी अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज घोषणा केली.

पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल मिळणार आहे. महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात आला आहे.

विविध कर्मचारी संघटनांच्या बैठकीत हा निर्णय झाला. सरनाईक म्हणाले, “महामंडळ आर्थिक अडचणीत असले तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी हिरावून घेता येणार नाही. हे औदार्य नाही, हा त्यांचा हक्क आहे.”

या निर्णयामुळे महामंडळावर १६० कोटींचा भार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या पाठबळामुळे एसटीचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सरनाईक म्हणाले.

एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये. प्रश्न संवादातून सोडवू, असे आवाहन त्यांनी केले.

—
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here