Home उद्योग / शिक्षण वार्ता मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या नूतन इमारतीचे उद्घाटन – मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते...

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या नूतन इमारतीचे उद्घाटन – मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न*

11
0

*🔴 MAI MEDIA 24 – हातकणंगले बातमी*

*कागल-हातकणंगले मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या नूतन इमारतीचे उद्घाटन – मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न*

*हातकणंगले / कागल :* कागल-हातकणंगले मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (MAKH) नूतन इमारतीचे उद्घाटन उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या सोहळ्यात *उद्घाटन फलक अनावरण, संग्राम पाटील डेव्हलपमेंट सेंटरचे लोकार्पण, शिरगांवकर सभागृहाचे उद्घाटन आणि मान्यवरांना रोप भेट* देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले,
*”मराठी उद्योजकांना ताकद देण्यासाठी केंद्र सरकारने Z सुरक्षा दिली आहे. मराठी माणसाने आता उद्योजकतेत पुढे आले पाहिजे. कागल-हातकणंगले औद्योगिक वसाहत ही महाराष्ट्रासाठी आदर्श पॅटर्न आहे.”*

या इमारतीमुळे परिसरातील उद्योजकांना एकत्रित प्लॅटफॉर्म मिळाला असून, औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार आहे. कार्यक्रमास MAKH चे पदाधिकारी, उद्योजक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | https://maimedia24.com*

—
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here