https://x.com/VijayWadettiwar/status/2095808321404158177
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांविरोधात अमरावतीत विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही निर्लज्ज आणि निष्क्रीय सरकारसाठी शरमेची बाब आहे.
वर्षानुवर्षे दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या भविष्याशी खेळ मांडला जात असताना शासन डोळे मिटून गप्प का बसले आहे? प्रत्येक वेळी आक्रोश आणि आंदोलन केल्याशिवाय या मुजोर व्यवस्थेला जाग येणार नाही का?
लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सचिवांना तातडीने पदावरून हाकलून या संपूर्ण घोटाळ्याची आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणारा भ्रष्ट कारभार आम्ही खपवून घेणार नाही; विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आम्ही पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.





















