*संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव!*
*१० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक !!*
*उच्च न्यायालयाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन व गोविंदांची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य राहील*
*ठाणे -*
सालाबादप्रमाणे यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे *शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १०* यावेळेत भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या संस्कारांचा वारसा जपत, *महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली* हा उत्सव साजरा होत आहे. मागील वर्षी कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर लावून विश्वविक्रम रचला होता.
यंदा उत्सवाला विशेष थीम आहे – *”अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव”*. महाराष्ट्र हा एकजुटीचा धर्म शिकवतो आणि या एकजुटीला प्रोत्साहन देणारी गोष्ट म्हणजे मराठी भाषा. मराठी भाषेचा प्रसार व प्रचार वाढावा यासाठी हा गौरव करण्यात येत असल्याचे *परिवहन मंत्री प्रताप सरनाईक* यांनी सांगितले.
*बक्षिसांची खैरात:*
– १० थर – ११ लाख + ट्रॉफी
– ९ थर (ठाणे शहर) – ५ लाख + ट्रॉफी
– ९ थर (ठाणे बाहेरील) – २ लाख + ट्रॉफी
– ८ थर – २५ हजार + ट्रॉफी
– ७ थर – १५ हजार + सन्मानचिन्ह
– ६ थर – १० हजार + सन्मानचिन्ह
– ५ थर – ५ हजार + सन्मानचिन्ह
– महिला गोविंदा पथकास विशेष पारितोषिक
*शालेय PT मध्ये गोविंदा सरावाची मागणी:*
दहीहंडी हा मातीतला खेळ पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून कबड्डी, खो-खो प्रमाणे इयत्ता ८ वी नंतर शालेय पीटीमध्ये गोविंदांचा सराव शिकवला पाहिजे, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे सरनाईक यांनी सांगितले. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन मिळाले आहे.
उच्च न्यायालयाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन व गोविंदांची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य राहील.
जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन *परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक* यांनी केले आहे.
*- शीतल हरीश करदेकर*
*MAI MEDIA 24 | ठाणे*
—


















