*मुंबई, 21 ऑगस्ट 2026*
*आदित्य ठाकरे दिमागी नक्षलींच्या संपर्कात? – मंत्री आशिष शेलार यांचा घणाघात*
गणेशोत्सवाच्या परंपरांवर सातत्याने आक्षेप घेणाऱ्या ‘दिमागी नक्षली’ प्रवृत्तींपासून मुंबईकरांनी सावध राहावे, असा इशारा देत भाजप नेते मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
*काय म्हणाले शेलार?*
पीओपी गणेशमूर्ती विसर्जनाबाबत हायकोर्टाने २४ जुलै २०२५ चे निर्देश कायम ठेवल्याने संभ्रम दूर झाला असून, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले.
“गणेशमूर्तीचा रंग कोणता? विसर्जन कसे करावे? रोषणाई कशी असावी? यावर सतत आक्षेप घेऊन कोर्टात दावे दाखल केले जातात. गणपती बनवणे, विक्री, सजावट आणि विसर्जनावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न कोण करतंय, हे मुंबईकरांनी ओळखलं पाहिजे,” असे शेलार म्हणाले.
*आदित्य ठाकरेंना थेट 3 सवाल -*
१. २०१८ मध्ये महापालिकेत शाडू आणि पीओपी असा भेद तुम्हीच का केला?
२. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी कसा बनतो, याची तुम्हाला कल्पना आहे का?
३. मूर्तींविरोधात कोर्टात गेलेल्यांविरोधात तुम्ही गप्प का? तुमचा त्यांच्याशी काही संबंध आहे का?
कोरोना काळात १०० वर्षांची परंपरा असलेला लालबागचा राजा विराजमान झाला नाही, त्याला तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
*काँग्रेसवरही हल्लाबोल -*
राहुल गांधींच्या व्हायरल व्हिडिओवरून शेलार म्हणाले, “काँग्रेसचा माणूस पैसे वाटण्याची ऑफर करतोय. हे २५ हजार कुठून येतात? हा पैसा टिळक भवनातून येतोय की विदेशातून? पोलिसांनी चौकशी करावी. काँग्रेसला देशात अराजकता पसरवायची आहे का?”
गणेशोत्सव, गोविंदा, कुंभमेळा, नागपंचमी यांसारख्या परंपरांवर आक्षेप घेणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.























