Home Trending Now १५ ऑगस्ट २०२६: ‘जय मानवता’- हात साफ आणि मन संवेदनशील ठेवा

१५ ऑगस्ट २०२६: ‘जय मानवता’- हात साफ आणि मन संवेदनशील ठेवा

67
0

15 ऑगस्ट 2026: ‘जय मानवता’- हात साफ आणि मन संवेदनशील ठेवा -शीतल हरीश करदेकर

आज ७९ वा स्वातंत्र्यदिन. सकाळी चौकाचौकात झेंडावंदन होईल. लहान मुले हातात तिरंगा घेऊन “वंदे मातरम” म्हणतील. स्टेटसवर देशभक्तीचे कोट येतील.

पण लालबहादूर शास्त्रींनी शिकवलं होतं – देशभक्ती म्हणजे १५ऑगस्टची घोषणा नाही, ती ३६५दिवसांची जबाबदारी आहे.

🇮🇳 १९६५चा नारा ते २०२६ चे ५ स्तंभ*

१९६५.भारत-पाकिस्तान युद्ध. देशात भीषण अन्नटंचाई. अमेरिकेने गहू देण्यास नकार दिला.
तेव्हा पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी स्वतःच्या घरापासून आठवड्यातून एक दिवस उपवास सुरू केला आणि देशाला दिला अजरामर नारा – “जय जवान, जय किसान”

त्याच आवाहनावर अभिनेता मनोज कुमार यांनी ‘शहीद’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर दिल्लीहून मुंबईला येताना, ट्रेनच्या २५ तासांच्या प्रवासात कागदाच्या कपट्यांवर ‘उपकार’ चित्रपटाची पटकथा लिहिली.
शास्त्रीजींचं ताश्कंदमध्ये गूढ निधन झाल्यानंतर इंदिरा गांधींनी स्वतः मनोज कुमार यांना बोलावून चित्रपट पूर्ण करायला मदत केली आणि तो करमुक्त केला.

होती ती संवेदनशीलता. होता तो देश.

आज २०२६ मध्ये आपण आणखी ३ स्तंभ जोडतोय.

कारण भारत फक्त २हातांवर चालत नाही. तो ५ स्तंभांवर उभा आहे.

१. जय जवान 🪖
देशाच्या सीमांचे रक्षण करणारे वीर. ‘उपकार’, ‘बॉर्डर’, ‘शेरशाह’, ‘हकीकत’ सारखे सिनेमे यांच्याच त्यागाची गाथा सांगतात. ‘हकीकत’ मधील बरेच सैनिक खरे युद्धातून आले होते.

२. जय किसान 🌾
अहोरात्र कष्ट करून देशाची भूक भागवणारा अन्नदाता. शास्त्रीजींच्या उपवासातून जन्मलेला स्तंभ. ‘मदर इंडिया’ ते ‘स्वदेस’ – शेतकऱ्याचं महत्व सिनेमाने नेहमी दाखवलं.

३. जय श्रमिक 👷
महत्व:पायाभूत सुविधा, रस्ते, पूल, कारखाने उभे करणारे हात. चाकण MIDC सारखी राज्यातील सर्वात मोठी MIDC, १.५ लाख कोटीचा महसूल आणि लाखो युवांचा रोजगार – या सगळ्यामागे श्रमिक आहे.
‘कुली’ पासून ते आजच्या कामगारापर्यंत – देश घडवणारे खरे शिल्पकार.
संदेश:श्रमिकाचा घाम सुकण्यापूर्वी त्याला मान आणि मोबदला द्या. हीच खरी “जय श्रमिक”.

४जय पत्रकार ✍️
महत्व: समाजातील वास्तव समोर आणून लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत ठेवणारे.
लाचखोरी उघड करणारे, श्रमिकाचा आवाज बनणारे, सत्तेला प्रश्न विचारणारे.
‘नायक’ सिनेमातला पत्रकार १ दिवसाचा CM होऊन व्यवस्था बदलतो. बाळशास्त्री जांभेकरांपासून आजपर्यंत पत्रकारितेचा धर्म हाच आहे.
संदेश: TRP साठी खोटं न पसरवता सत्य दाखवणारा पत्रकारच “जय पत्रकार” ला सार्थ करतो.

५. जय मानवता
या ४ स्तंभांचा आत्मा. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे.
शास्त्रीजींचा नैतिक जबाबदारीने राजीनामा, दिलीप कुमारांनी ‘लीडर’ च्या शूटिंगमध्ये जमिनीवर पडलेले तिरंगे उचलणे – हीच मानवता.

*🎬 सिनेमाने दाखवलेला आरसा*

रंग दे बसंती (२००६) – जेव्हा नेते “हात बरबटवून” खराब विमानाचे पार्ट घेतात, तेव्हा आपलेच जवान शहीद होतात.
स्वदेस (२००४) – “मी म्हणत नाही देश सर्वोत्तम आहे. पण आपण तो उत्तम बनवू शकतो.” नासाची नोकरी सोडून गावासाठी वीज बनवणं ही खरी देशभक्ती.

⚠️ आजचा सर्वात मोठा प्रश्न काय, तर

आज झेंडावंदन करताना बरबटले हात थरथरतील का?
देशासाठी बलिदान देणाऱ्यांची आठवण होईल नक्की…

पण आज एकच दिवस नाही. आजन्म आपल्या जनतेच्या हितासाठी काम करण्याची जबाबदारी घेतील का?

केवळ घोषणा देणे म्हणजे देशभक्ती नाही.
लाच न घेणे ही देशभक्ती आहे.
श्रमिकाला वेळेवर पगार देणे ही मानवता आहे.
सत्याची साथ देणे ही पत्रकारिता आहे.
१६ ऑगस्टला रस्त्यावर तिरंगा न फेकणे ही जाणीव आहे.

💡 माईमीडिया24 चा संकल्प

देशभक्ती १५ ऑगस्टपुरती मर्यादित नको.
चेहऱ्यावर तिरंगा रंगवण्यापूर्वी, अंतःकरणात देश रंगावा.

चला एकत्र म्हणूया –
*जय जवान! जय किसान! जय श्रमिक! जय पत्रकार! आणि सर्वात महत्त्वाचे… जय मानवता!* 🇮🇳

_लेख आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा._
_सविस्तर बातम्या आणि किस्से वाचा: https://maimedia24.com/22781/_

*#MyMedia24 #IndependenceDay2026 #JaiJawan #JaiKisan #JaiShramik #JaiPatrakar #JaiManavta #LalBahadurShastri #UpkarMovie*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here