Home मुंबई *वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला: “आश्रमशाळा म्हणजे मृत्यूचा सापळा”*

*वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला: “आश्रमशाळा म्हणजे मृत्यूचा सापळा”*

24
0

*वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला: “आश्रमशाळा म्हणजे मृत्यूचा सापळा”*
_२वर्षांत ५८४विद्यार्थी मेले, १०वर्षांपासून फाईल धूळ खाते_

 

*मुंबई* – विरोधी पक्षनेते *विजय वडेट्टीवार* यांनी राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी मृत्यूवरून सरकारला धारेवर धरलं आहे.

वडेट्टीवार यांनी X वर ट्विट करत धक्कादायक आकडेवारी मांडली.
*”गेल्या २ वर्षांत राज्यातील आश्रमशाळांमधील ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ५% मृत्यू सर्पदंशामुळे झाले आहेत”* असं त्यांनी म्हटलं.

*”फाईल धूळ खाते, पोरं मरतात”*
वडेट्टीवार म्हणाले, “आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी १० वर्षांपूर्वी सरकारनेच समिती नेमली होती. कॉट, मच्छरदाणी, सुरक्षित इमारत यांच्या शिफारसी केल्या. पण त्या शिफारसींची फाईल आजही धूळ खात पडली आहे.”

*”कोट्यवधीचा प्रकल्प होतो, पण मच्छरदाणी नाही”*
“मुलांना कॉट आणि मच्छरदाणी देण्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी सरकारकडे वेळ नाही. पण कोट्यवधीच्या प्रकल्पासाठी मात्र सरकार राबत आहे. ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे” अशी टीका वडेट्टीवारांनी केली.

*मागणी काय?*
१. ऑडिट नको, जबाबदारी निश्चित करा
२ दोषींवर कठोर कारवाई करा
३. आश्रमशाळांमध्ये सुरक्षिततेच्या सर्व सुविधा तातडीने द्या

*”आदिवासी विद्यार्थ्यांचे जीव स्वस्त आहेत का?”* असा सवाल करत वडेट्टीवारांनी सरकारला जाब विचारला आहे.

_स्रोत: विजय वडेट्टीवार यांचे अधिकृत X ट्विट_

वडेट्टीवारांचा सवाल:

२ वर्षात ५८४ मृत्यू
आश्रमशाळांमध्ये.

कारण: सर्पदंश + सुविधा नाहीत

१० वर्षांपूर्वी समितीने सांगितलं:
“मच्छरदाणी द्या”
सरकार: फाईल बंद

कोट्यवधीचा प्रकल्प: हो
मुलांना कॉट: नाही

ही शरम आहे.

#VijayWadettiwar #AshramShala #Adivasi #Maimedia24

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here