*दीपक देऊलकर यांना मातृशोक*
अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक श्री. दीपक देऊलकर यांच्या मातोश्री श्रीमती शुभांगी देऊलकर यांचे सोमवारी २७ जुलै २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पुत्र श्री. दीपक देऊलकर, सून अभिनेत्री निशिगंधा वाड देऊलकर आणि नात कु. ईश्वरी असा परिवार आहे.
कला शाखेच्या पदवीधर असलेल्या शुभांगी देऊलकर यांनी प्रख्यात आर्किटेक्चर फर्ममध्ये अनेक वर्ष कार्यरत राहून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. निवृत्तीनंतरही त्या अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांशी संलग्न होत्या.



















