Home मुंबई *गुरु स्कूलचे गुरुपौर्णिमे निमित्त नवीन नाटक*-*विकत घेतले टेन्शन..*

*गुरु स्कूलचे गुरुपौर्णिमे निमित्त नवीन नाटक*-*विकत घेतले टेन्शन..*

14
0

*गुरु स्कूलचे गुरुपौर्णिमे निमित्त नवीन नाटक*-*विकत घेतले टेन्शन..*

गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक शिष्यवर्ग आपल्या गुरुचे पूजन करतात, त्याला वेगवेगळ्या भेटी देतात ,त्याच्याबद्दल मनापासून बोलतात .
पण गुरू स्कूल अर्थात गुफान या रंगभूमी कला संस्थेमध्ये मात्र गुरूच्या सन्मानासाठी गुरु स्कूलच्या शिष्यांनी विकत घेतले टेन्शन या नाटकाचे अभिवाचन केले ,आणि टेन्शन लेस जगणे आजच्या काळामध्ये अवघड आहे तरीसुद्धा त्याच्यातून आपण थोडासा दुसऱ्याचा विचार करून मार्ग काढू शकतो अशा आशयाचा संदेश या निमित्ताने या नाटकातून दिला.
गुरुवर्य देवदत्त पाठक यांचे लेखन असलेले हे नाटकाचे
नभोनाट्यासारखे वाचन करून गुरूच्या प्रति असलेला स्नेह, आदर भाव या निमित्ताने त्यातील विद्यार्थी कलाकार मल्हार बनसुडे ,धनश्री गवस, ऋतुजा केळकर यांनी सादर केला, या नाटकाचे दिग्दर्शन मिलिंद केळकर या त्यांच्या ज्येष्ठ शिष्याने केले.
या नाटकाची विशेष गोष्ट अशी की याचा अभिवाचना बरोबर प्रत्यक्ष नाट्यप्रयोगही होत आहे, म्हणजेच हे नाटक बसून लोकांना नभोनाट्यासारखे ऐकवले जाते नी तसेच ते रंगमंचावरती अभिनयासह दाखवले जाते .
गुरु पौर्णिमेला गुरुचे पूजन आणि वंदन होत असताना, रंगभूमी कलेला रंजन प्रबोधन करण्यासाठी माध्यम आणि साधन म्हणून वापर करून उपयोग करून गुरुस्कूल ने विकत घेतले टेन्शन हे नाटक उभे केले आहे .
माणसाच्या जन्मापासून निर्माण झालेले टेंशन आज भस्मासुरासारखे माणसाची मानसिक स्थिती बिघडून त्याला खाऊन टाकत आहे ,अशा परिस्थितीत थोडासा दुसऱ्याचा विचार करून नमते घेणे जमले तर हे टेन्शन निश्चितच संपून जाईल .अशा आशयाचा आणि विषयाचा विचार करून हे नाटक सादर होतं आहे .
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिव राहणे, गौरी बनसोडे, उषाकिरण देशपांडे ,राहुल फाटक, रवींद्र सातपुते ,आर्या करपे ,संजू इंगळे यांच्या मदतीने अनेकांनी या नाट्य अभिवाचनाचा आनंद घेतला, आणि रंगभूमी कलेलाच गुरु मानून सादर झालेली गुरुवर्य देवदत्त पाठक यांच्या गुरु स्कूल गुफांनच मधली ही नाट्यनिर्मिती एक आगळी वेगळी गुरुपौर्णिमा ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here