Home मुंबई *समग्र शिक्षा अंतर्गत शाळा दुरुस्तीची कामे बांधकाम विभागामार्फत करावीत : मंत्री जयकुमार...

*समग्र शिक्षा अंतर्गत शाळा दुरुस्तीची कामे बांधकाम विभागामार्फत करावीत : मंत्री जयकुमार गोरे*

8
0

मुंबई, दि. २८ जुलै, २०२६ : सांगली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या इमारती, वर्गखोल्या बांधकाम, विशेष दुरुस्ती तसेच इतर विकासकामांबाबत मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली.

बैठकीत समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळा दुरुस्तीची कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात यावीत, असे निर्देश मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच कामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेत पूर्णत्व यावर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

बैठकीस सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. तसेच सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. विशाल नरवाडे हे दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) द्वारे सहभागी होते.

000 00

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here