Home Trending Now पत्रकार सत्ताकेंद्र विरुद्ध खऱ्या माध्यमकर्मीची लढाई…बाकी सगळं धूर आहे कडवं डावं...

पत्रकार सत्ताकेंद्र विरुद्ध खऱ्या माध्यमकर्मीची लढाई…बाकी सगळं धूर आहे कडवं डावं – कडवं उजवं काही नसतं !- शीतल हरीश करदेकर

91
0

पत्रकार सत्ताकेंद्र विरुद्ध खऱ्या माध्यमकर्मींची  लढाई …बाकी सर्व धुर  फोकनाड आहे.कडवं डावं – कडवं उजवं काही नसतं!आजची लढाई डावा विरुद्ध उजवा नाही.
आजची लढाई आहे: सत्ताकेंद्र विरोधी खऱ्या माध्यमांची

●१. वृत्त सत्ताकेद्र ●
कोणाला अधिस्विकृती श्रेष्ठ? कोणाला सरकारी  विशेष मदत ? कोणाला मोठं पद ?इथे काम करणारा नाही ,  विशेष पोसलेला जवळपास रहातात.

●२. संस्था केंद्र●
प्रेस क्लब, पत्रकार संघ , परिषद इथे 
काम काय तर  इमारत मालकी, इव्हेंट, खुर्ची टिकवणे.
पत्रकार  कामगार कायदा, महामंडळ, सर्व सुरक्षा  यापैकी  एक शब्द ही इथे येत नाहीत.. 

*म्हणजे नूरा कुस्ती*
सत्ताकेंद्र असणारी संस्था  जेव्हा असते तेव्हा .
संस्थावालेकडे याचकच  असतात.त्यांची लढाई  ही नुरा कुस्ती असते. आणि खरा माध्यमकर्मी आणि संघटना  भरडल्या  जातात.

 मीडिया असोसिएशन  ऑफ  इंडिया च्या संस्थापक व अध्यक्ष शीतल हरीश करदेकर यांनी पत्रकार महामंडळ मागितलं – या आझाद  मैदानावरील संस्था गप्प. निवांत.
प्रशांत आष्टीकर यांनी  महाराष्ट्र सरकारच्या वेबपोर्टल वरील अधिस्विकृती समिती  हटवण्यात  मोठ योगदान दिले.

ज्या पत्रकार परिषदेवर प्रशासक आहेत ती संस्था व प्रतिनिधी समितीवर कसे?  इतरही बाद संस्था प्रतिनिधी अधिस्विकृती समितीत कसे? म्हणून  कायदेशीर  आवाज उठवत कृती केली. पत्रकारांसाठी अधिस्विकृती , सन्मान योजना समितीवर  हे अनधिकृत  कसे हा सवाल उठवत आम्हीही आवाज उठवला.

या सर्व चुकीच्या गौष्टी विरोधात एक नियोजनबध्द कामगार कायद्यानुसार पत्रकार कल्याणकारी महामंडळ असायलाच हवं म्हणून चारशे शुगर  असताना मी दि११-१२ जुलै २०२४ला आझाद मैदानावर आमरण  उपोषण केले. – पण तिथेही विशिष्ट पत्रकार  पोसणार्यांनी वाईट राजकारण खेळले.

माझी तब्येत  ठीक नव्हती .भर पावसात  उपोषण करणाऱ्या महिला पत्रकार  अध्यक्षाचे दिल्लीत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्याशी बोलणं करुन दिल.

आपली भेट झाल्याशिवाय  उपोषण सोडणार नाही असं मी सांगितलं. पण या काळात माझी तब्येत तपासणीस ना डाॅक्टर  पाठवले ना विचारपूस करायला पोलीस आले.

मुख्यमंत्री भेटीसाठी आझाद  मैदान  ते विधान भवन पोलीस सुरक्षेत मला घेऊन  जाणे आवश्यक  होते.

पण मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांचे माध्यम  सल्लागारांनी आणि इतरांनी काय ठरवलं होतं माहिती नाही पण माझ्या जीवावरचा हा प्रसंग होता. याचे सगळे आरटि आय कागदपत्र  मी काढलेत.

बहिण माझी लाडकी योजना कौतुकाने राबवत मिरवणाऱ्या माझ्या कामाचा राग होता की आणखीन काय ते बाहेर येणारच. मंत्रीमंडळात  मंजुर झालेले पत्रकार  महामंडळ  ही गायब असल्याचे कागदपत्रातून दिसते आहे..

पत्रकार महिलेचे श्रमिक  महिलेचे असे हाल करत का कुणी?

माझी शुगर दुसर्‍या दिवशी खूप खाली गेली होती चक्कर आली. जीव वाचवत घरी गेले आणि नंतर प्रचंड आजारी पडले.  माध्यम सल्लागार इतके भयंकर  असू शकतात की हा आणखी कोणाचा आदेश होता? 

हे आज लिहिण्याचं कारण म्हणजे  हे वेळेत लिहिणं भाग होतं. खरे पत्रकार  माध्यमकर्मी कोण हे रजिस्टर  होणे आवश्यक आहेच. कारण विषय पत्रकारांच्या हिताचा होता. आणि आहे.
सत्ता आणि मालकांच्या हिताचा नव्हता.

●चौथ्या स्तंभातले झाकण झुले फंटर●
खऱ्या माध्यमकर्मींना हक्कआणि सन्मानापासून वंचित ठेवलं जातं .का? जे स्वतःच्या माध्यमातले विरोधाभास अन्याय लिहू शकत नाहीत, ते  चौथा स्तंभ कसे?                                    ●हेच सहन करताहेत पत्रकार.●
खऱ्या गुणवत्तेची कदर नाही.
झापड-गॅग मध्ये  सामील होणारे स्वार्थी जास्त आहेत.

एकाला खुर्ची.
इमारत, बांधकाम विकास इतर फायदे मिळतील 
आणि खऱ्या माध्यमांना? कायदा, सुरक्षा, महामंडळ हवं आहे.
ते काही पाळीवांना नको आहे असं   नाही. 

पण जोपर्यंत सत्ताकेंद्र आणि संस्था केंद्र एकत्र आहेत, तोपर्यंत  आवाज मोठा होणार नाही असं काही नाही.खरे पत्रकार एकत्र आहेत आणि रहातील.

—-

#मूळ_विष #पत्रकार_सत्ताकेंद्र #खरा_माध्यमकर्मी #11जुलै_उपोषण #चौथा_स्तंभ #MAIMEDIA24

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here