Home मुंबई *लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य करण्याचा प्रस्ताव; बालविवाह रोखण्यासाठी सरकारची तयारी*

*लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य करण्याचा प्रस्ताव; बालविवाह रोखण्यासाठी सरकारची तयारी*

43
0

*मुंबई :* राज्यातील बालविवाहांना आळा घालण्यासाठी लग्नपत्रिकेवर वधू आणि वराच्या नावासोबत त्यांची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. राजस्थान सरकारने लागू केलेल्या नियमाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा निर्णय घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली आहे.

विधानसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक आहे. परभणीमध्ये ४८ टक्के, बीडमध्ये ४३.७ टक्के, धुळेमध्ये ४०.५ टक्के आणि सोलापूरमध्ये ४०.३ टक्के बालविवाह होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महिला व बालविकास विभागाने दिलेल्या लेखी उत्तरात बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासावर गंभीर परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती मोहिमा आणि लग्नपत्रिकेवर जन्मतारीख अनिवार्य करण्यासारखे उपाय राबविण्याचा विचार सुरू आहे.

हा नियम लागू झाल्यास लग्नाच्या वेळी वधू-वराचे वय पडताळणे अधिक सोपे होईल आणि बालविवाह रोखण्यासाठी मदत मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे. या प्रस्तावाबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here