वयाच्या ८०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचे निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता मुंबईतील सायन रुग्णालयात त्यांचे निधन झाले. सायंकाळी साडेसहा वाजता कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्य संस्काराच्या वेळी राकेश बेदी, कुलदीप सिंह, इप्टा या नाट्य संस्थेचे कलाकार उपस्थित होते
“चित्रपटसृष्टीने एक लाडका स्टार गमावला” ,भावूक झालेल्या अवतार गिल यांनी सांगितले की,
दुपारी ३वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती त्यांचे अनेक अवयव निकामी होऊ लागले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी या अभिनेत्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच इंटरनेटवर दुःखाची लाट पसरली.
हिंदी चित्रपटसृष्टीतील भारत कपूर हे एक सुप्रसिद्ध चेहरा होते. त्यांनी १९७०, ८० आणि ९०च्या दशकात उत्कृष्ट काम केले. आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. छोट्या भूमिका असोत, सहाय्यक भूमिका असोत की खलनायकी भूमिका असोत, त्यांनी प्रत्येक भूमिकेत उत्तम कामगिरी केली.
त्यांनी१९७२ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हापासून भरत कपूर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी प्रत्येक भूमिका आपलीशी केली. ते बऱ्याच काळापासून मनोरंजन विश्वापासून दूर होते.
२०११ पासून ते पडद्यावर दिसले नाहीत. चाहत्यांनी त्यांना पडद्यावर मिस केले. पण आता त्या कायमच्या स्मृती राहिल्या. आपल्या चमकदार कार्यामुळे ते लोकांच्या आठवणीत जिवंत राहतील. भरत यांवी नूरी, राम बलराम, लव्ह स्टोरी, बाजार, गुलाम, आखरी रास्ता, सत्यमेव जयते, स्वर्ग, खुदा गवाह, रंग, बरसात आणि साजन चले ससुराल या चित्रपटांमध्ये काम केले. कॅम्पस, परंपरा, राहत, सांस, अमानत, भाग्यविधाता, आणि कहानी चंद्रकांता की यांसारख्या टीव्ही मालिकांमधून त्याने टेलिव्हिजनवरही आपली नवी ओळख निर्माण केली होती.






















