*कामगार, उद्योग इतर विभाग काटेकोर काम कधी करणार?*
*कामगार कायदे फायद्याचे मग माध्यमकर्मीही वंचित का?*
*उसतोड, वीटभट्टी, बांधकाम ,घरकाम या सगळ्यांची नोंद होऊन त्यांना श्रमिक म्हणून लाभ ,सर्व प्रकारची सुरक्षा मिळते..अशी टिमकी वाजवली जातेय.*
*चेंबुरमध्ये मोठी दुर्घटना होळी आधी घडली.८ व्या मजल्यावरुन ६ कामगार पडले, एकाचा मृत्यू*
*जखमी कामगारांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल* *करण्यात आले आहे. या कामगारांनी सेफ्टी किट न वापरल्याचे दिसले.*
*या कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ २०१५ पासून काम करतेय.या मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष नागपुुरचे ओमप्रकाश (मुन्ना) यादव हे होते. त्यांनी विविध बैठकांमध्ये मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम *पाहिले.याव्यतिरिक्त कामगार मंत्री म्हणून ॲड. आकाश फुंडकर यांनी देखील कामगारांच्या नोंदणी संदर्भात महत्त्वपुर्ण निर्देश दिले आहेत. पण हे कायदे असूनही या कामाच्या ठिकाणी सुरक्षे बाबतीत खुंटीला टांगले जातात.*
*चेंबूरच्या सुभाष नगर परिसरात एका इमारतीचा पुनर्निविकास होत होता, मग म्हाडाचे, व इतर विभागाचे अधिकारी काय करत होते.*
*कोण हा बांधकाम* *कंत्राटदार, विकासक आहे.*
*जो कामगारांच्या जीवाशी खेळण्याचे धाडस करतो? इमारत क्रमांक ३६ चे बांधकाम सुरू असताना सहाव्या आणि आठव्या मजल्यावर विटांचे काम सुरू होते. या कामगारांनी*कामाच्या ठिकाणी हेल्मेट किंवा सेफ्टी बेल्ट वापरले नव्हते, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.*
*पण हे बांधकाम मंडळ काय काळजी घेते. कामाच्या ठिकाणी इथले अधिकारी तपास करतात की नाही?हे कोण पहाणार?*
● *दुसरी भयंकर घटना, मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील!*
*नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव च्या ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’ (पुर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी भयंकर स्फोट झाला त्यात १७ कामगार ठार झाले असून, १८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. खाण व औद्योगिक स्फोटके निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या कारखान्यात हा स्फोट झाला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.*
*या ठिकाणी डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स, सिजमिक एक्सप्लोसिव्ह्सचे उत्पादन होते. ‘एसबीएल’च्या विविध युनिटमध्ये ३५ हून अधिक कर्मचारी (महिला?) काम करत होते. या स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. स्फोटात मृतदेह ओळखू येणार नाही इतके जळाल्याने मृतांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांचे डीएनए नमुने घेण्यात येत आहेत. तर जखमींना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. कंपनीने अंतर्गत चौकशी सुरू केली असून तपासाच्या निष्कर्षानुसार योग्य दुरुस्ती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. प्रभावित कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत करणे ही आमची प्राथमिकता असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.*
*जखमींना उपचारासाठी नागपूरला हलवले*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून स्फोटाच्या कारणांचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे. आपण स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.*
● *स्फोटाचे नेमके कारण अस्पष्ट!*
*हा स्फोट पॅकिंग विभागात झाला. त्यावेळी कोणतीही सक्रिय उत्पादन प्रक्रिया सुरू नव्हती. नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होईल.*
*पंतप्रधान नरेंद्र मोदींना दु:ख नागपूर स्फोटात मृत्यू पावलेल्या कामगारांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या निकटवर्तीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून दोन लाख रुपये व जखमींना ५०च हजारांची मदत जाहीर केली आहे.*
*दुर्घटना घडल्यावर मदत करणं म्हणजे नक्की काय हा न कळणारा प्रश्न आहे.*
*पण आधीच कंपनी ,उद्योग क्षेत्र,अशा ठिकाणी कामगार विभाग व उद्योग , एम आयडीसीचे अधिकारी तपासणी,*निरिक्षण करतात का याची शंका वाटतेय!*
● *श्रमिक कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न प्राधान्याने प्रथम असायला हवा, सुरक्षा, किमान वेतन आणि नियमानुसार त्यांचे अधिकार मिळायला हवेत.*
*अनेक कारखाने, उद्योग क्षेत्रात काम करणारे कंत्राटदार नियम धाब्यावर ठेवून काम करताना दिसतात.*
● *कामगार विभाग, उद्योग विभाग व कामगार आयुक्तालयातील टिम इथे ताकदीने काम करताना दिसायला हवीच.*
*त्रिपक्षीय समिती राज्य व महसूल विभागवार गठीत होऊन कार्यरत असायला हवी.*
*श्रमिक माध्यमकर्मींसाठी त्रिपक्षीय समिती हवीच!*
*मालक ते पत्रकार सगळेच सन्मानाने या क्षेत्रात वावरायला हवे,दमन ,दबाव यापासून दूर असले पाहिजेत. हे खरं आजच्या जगात अशक्य आहे, पण या अनेक अन्याय प्रवृत्ती विरोधातच पत्रकार नोंदणी व कल्याणकारी मंडळासाठी जीव पणाला लावून आमरण उपोषण करणारी ही,*शीतल हरीष करदेकर (माई ) ,*आजच्या एकूणच अवस्थेने खूप व्यथित आहे.कारण माझी लाडकी बहिण शेतकरी, श्रमिक यांच्या* *कष्टावर देशचालतो… हे *जग श्रमिकांच्या घामावर,*बुध्दीवर सोबत धनिक उद्योजकांच्या समन्वयाने चांगल्या प्रकारे सक्षमपणे चालते. असं आमचं ठाम मत आहे.*
*कारण दि. २१ नोव्हेंबरपासून देशात चार नवीन कामगार कायदे लागू झाले असून, मोदी सरकारने कामगार सुधारणांच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. वेतन संहिता, २०१९; औद्योगिक संबंध संहिता, २०२०; सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्य अटी संहिता, २०२० अशा या चार कामगार कायदे तयार करुन मागील कामगार कायदे बाद केलेत.आता आपल्याला सगळच मिळेल या भ्रामक कल्पनेत आपण जगत नाही.*
●● *मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी पत्रकार महामंडळाला मंजुरी मिळवून दिली. पण आज लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी बोलणारे शिंदे साहेब आपल्याच राजकारणात व्यस्त आहेत.*
*काय नि कसं व्यक्त व्हावं कळत नाही.कायदे करणारे ,सुधारणा करणारे, नियमावली ठरवणारे प्रशासन व प्रशासक प्रसारमाध्यमांचे हितचिंतक नाहीत, का?* *असतीलही मोजके लोकप्रतिनिधीं आमच्या बाजूने.पण जोवर हा समाजसेवेचा उद्योग पुर्ण सक्षम ताकदीने उभा रहात नाही तोवर चौथा स्तंभ वंचितच असेल.*
*कामगारांच्या संदर्भात संख्यात्मकदृष्ट्या सांगायचे म्हणजे, आज देशांतर्गत श्रमिकक्षेत्रात सुमारे ५० कोटी कर्मचारी-कामगार कार्यरत असून, त्यापैकी अधिकांश म्हणजेच सुमारे ९० टक्के कामगार हे असंघटित क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा या नव्या तरतुदींमध्ये प्रकर्षाने विचार करण्यात आल्याचे दिसून येते.*
●● *मात्र यातून आमचा प्रसारमाध्यम कर्मी वंचित का आहे याचं कारण किमान राज्यातील कामगार मंत्री सांगणार का?*
*कामगार कायदे व नियम यांची पारदर्शी व*परिणामकारक स्वरूपात अंमलबजावणी करण्यासाठी*संगणकीय पद्धत आणि प्रक्रियेची अंमलबजावणी आवश्यक करण्यात*आलीय.पण मग आमची नोंदणी का का होत नाही?*हा प्रश्न मोठा आहे.*
*दि. १६ फेब्रुवारी २०१७ पासून कामगार वेतन कायद्यात कामगारांचे वेतन चेकद्वारा अथवा थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्याची तरतूद करण्यात आली.*
*मातृत्वविषयक कायद्यांतर्गत २०१७ मधील नव्या तरतुदींनुसार दि. १ एप्रिल २०१७ पासून मातृत्व रजेचा कालावधी १२ आठवड्यांहून २६ आठवडे एवढा करण्यात आला.*
● *नव्या तरतुदींनुसार ‘किमान वेतन कायदा’ आता सुमारे ५० कोटी कामगारांना लागू होईल. यामध्ये संघटित व असंघटित अशा दोन्ही क्षेत्रांतील कामगारांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, वेतन वितरणाची जबाबदारी कालबद्ध स्वरूपात निश्चित करण्यात आली आहे.*
*सारख्या स्वरूपाचे काम करणार्या महिला व पुरुष कामगारांना समान वेतन देणे आता कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे.*
*२०१९च्या नव्या कामगार कायद्यातील तरतुदी आता सर्व उद्योगातील कामगारांना लागू करण्यात आल्या असून, त्याची दर पाच वर्षांनंतर कामगारांच्या किमान वेतनाची फेररचना केली जाणार आहे. असं म्हणतात!*
पण हे होणार कधी?*
●● *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री फुंडकर यांनी याबाबत युध्द पातळीवर काम करायला हवे.*
*अन्यथा महाराष्ट्राच्या लढाऊ लेकीची, श्रमिक माध्यमकर्मींचीफसवणूक झाली, केली असेच म्हणावे लागेल!*
*धुळवडीला रंग कोणताही नाही पण *श्रमिकांच्या हितासाठी जेव्हा महाराष्ट्र वेगाने काम करू लागेल, तो महाराष्ट्रासाठी सोन्याचा ठरेल आणि त्याच दिवशी श्रमिकांच्या भल्याचा गुलाल उडवला जाईल.*
***
*लेखन दि. ३/३/२०२६*



















