Home मुंबई *ध्येयनिष्ठ पत्रकारितेला साठ वर्षे पुर्ण होणे हा चमत्कार आहे , पद्मभूषण देशपांडे...

*ध्येयनिष्ठ पत्रकारितेला साठ वर्षे पुर्ण होणे हा चमत्कार आहे , पद्मभूषण देशपांडे यांनी केला आहुतिचा गौरव

70
0

मुंबई,
आज पूर्णपणे लोप पावलेल्या एका ध्येयनिष्ठ पत्रकारितेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे. अशा प्रकारच्या ध्येयनिष्ठ पत्रकारितेला साठ वर्षे पूर्ण होणे हा चमत्कार आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार, दैनिक प्रहारचे संपादक पद्मभूषण देशपांडे यांनी आहुति आणि त्रिवेदी परिवाराचा गौरव केला. ‘साप्ताहिक आहुति’ च्या हीरक महोत्सवानिमित्त अंबरनाथ येथील वडवली विभागात असलेल्या रोटरी सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण देशपांडे हे बोलत होते. ‘आहुति’ची स्थापना ध्येयवादातून झाली. त्या ध्येयवादामागील शुचिता दिवंगत वसंत त्रिवेदी यांच्या नंतरच्या पिढीनेही सांभाळली. दिवंगत त्रिवेदी यांच्यामध्ये असलेली बंडखोरी, समाजासाठी आयुष्य झोकून देण्याची समर्पित वृत्ती आणि माध्यमाबाबतची निष्ठा पुण्याईच्या रूपाने यांच्यामागे आहे. त्यामुळेच आज हिरक महोत्सव साजरा होतो आहे. योग्य वेळी अमृत महोत्सवही होईल. इथे अगत्याने उपस्थित असलेल्या सर्वांच्या शुभेच्छा शतक महोत्सवासाठीही उपयोगी ठरतील, या शब्दात देशपांडे यांनी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या. पत्रकारितेचा प्रवास सध्या भाषा, सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता याबाबतच्या ‘अनास्थेच्या प्रदेशा’ तून सुरू असून माध्यम व्यवसायाच्या रचनेत आमूलाग्र बदल झाल्याशिवाय यात सुधारणा होणार नाही, असे परखड मतही पद्मभूषण देशपांडे यांनी मांडले. माहितीचा विस्फोट आणि तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेली माहिती पोहोचवण्याची जलद साधने यांमुळे वृत्तपत्रांचे माहिती देण्याचे काम जवळजवळ संपले आहे. टिकायचे असेल, तर वृत्तपत्रांना निव्वळ माहिती पलीकडे जाऊन धागेदोरे, विश्लेषण द्यावे लागेल. त्यासाठी आता आहे त्यापेक्षा अधिक गंभीर पत्रकारितेची आणि अधिक व्यासंगी व्यक्तींची गरज या क्षेत्राला आहे. ती पूर्ण करण्यासाठी समाजातील बुद्धिमान व्यक्तींना या क्षेत्राकडे पुन्हा आकर्षित करावे लागेल. त्यासाठी माध्यम क्षेत्राच्या व्यवसायाचे गणित पूर्णतः नव्याने उकलावे लागेल.” असेही ते म्हणाले. इंग्रजी नववर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय संस्कृती वरचढ ठरली, मनोज सानप यांनी केले आहुति परिवाराचे कौतुक! आपल्या हिंदु संस्कृतीमध्ये यज्ञात आहुति द्यावी लागते. ‘आहुति’ साप्ताहिकाने समाजातल्या अनिष्ट प्रथांची, अज्ञानाची आहुति दिली. ज्ञानाचा प्रकाश समाजाला दिला. एक कार्यकर्ता म्हणून संपादक गिरीश त्रिवेदी हे ज्या पद्धतीने वावरताहेत. या सभागृहाचा एकही कोपरा त्यांनी सोडलेला नाही. याला म्हणतात एखाद्या बाळाचं संगोपन केल्यानंतर सुद्धा अगदी ते बाळ आता खूप मोठ्ठं झालंय. मोठा वटवृक्ष झालाय. साठ वर्षाचं बाळ झालंय. एखादा सो कॉल्ड पत्रकार असता तर तो एका ठिकाणी मस्तपैकी जॅकेट बिकेट घालून एकदम ताठ मानेने बसून राहिला असता पण हा खरा कार्यकर्ता आहे की बाळाच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे साठाव्या वाढदिवशी सुद्धा ते आपल्या बाळाचं संगोपन बघा किती छान करतायत. आजच्या या कलियुगात इतका सुंदर तीन देवींनी मंत्रोच्चार केला त्यात आपण तल्लीन झालो. इंग्रजी नववर्षाच्या पहिल्या दिवशी आजच्या कार्यक्रमामुळे भारतीय संस्कृती वरचढ ठरली. नववर्षाचा पहिला दिवस इतका चांगल्या पद्धतीने साजरा होतोय, हे मी माझ्या दृष्टीने भाग्याचे समजतो.” अशा शब्दांत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय चे कोकण विभागाचे प्रभारी उपसंचालक, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी श्री मनोज सुमन शिवाजी सानप यांनी आहुति परिवाराचे कौतुक केले. इंग्रजी नववर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय संस्कृती वरचढ ठरली. ; मनोज सानप यांनी केले आहुति परिवाराचे कौतुक यज्ञात आहुति द्यावी लागते. या. आहुति साप्ताहिकाने समाजातल्या अनिष्ट प्रथांची, अज्ञानाची आहुति दिली. ज्ञानाचा प्रकाश समाजाला दिला. एक कार्यकर्ता म्हणून संपादक गिरीश त्रिवेदी हे ज्या पद्धतीने वावरताहेत. या सभागृहाचा एकही कोपरा त्यांनी सोडलेला नाही. याला म्हणतात एखाद्या बाळाचं संगोपन केल्यानंतर सुद्धा अगदी ते बाळ आता खूप मोठ्ठं झालंय. मोठा वटवृक्ष झालाय. साठ वर्षाचं बाळ झालंय. एखादा सो कॉल्ड पत्रकार असता तर तो एका ठिकाणी मस्तपैकी जॅकेट बिकेट घालून एकदम ताठ मानेने बसून राहिला असता पण हा खरा कार्यकर्ता आहे की बाळाच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे साठाव्या वाढदिवशी सुद्धा ते आपल्या बाळाचं संगोपन बघा किती छान करयायत. आजच्या या कलियुगात इतका सुंदर तीन देवींनी मंत्रोच्चार केला त्यात आपण तल्लीन झालो. इंग्रजी नववर्षाच्या पहिल्या दिवशी आजच्या कार्यक्रमामुळे भारतीय संस्कृती वरचढ ठरली. नववर्षाचा पहिला दिवस इतका चांगल्या पद्धतीने साजरा होतोय, हे मी माझ्या दृष्टीने भाग्याचे समजतो.” अशा शब्दांत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय चे कोकण विभागाचे उपसंचालक, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी आहुति परिवाराचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, “साप्ताहिक ज्या पद्धतीने चालले आहे, ते पाहता हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या वाचकांपासून वितरकांपर्यंत सगळ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचाच सोहळा आहे.” आमदार किसन कथोरे यांनी सरपंचपदी असल्यापासून ‘आहुति’सोबत असलेला ऋणानुबंध व्यक्त केला.*
*बदलापुरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे आणि अंबरनाथच्या नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजुले यांनीही ‘आहुती’ला शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आपल्या भाषणात त्यांनी ‘आहुति’ च्या जीवन प्रवासाचा सविस्तर आढावा घेतला. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी व्यक्तिशः उपस्थित राहून त्रिवेदी परिवाराला शुभेच्छा दिल्या.नगरसेविका एडवोकेट अपर्णा भोईर, पल्लवी लकडे, सुजाता भोईर, निखिल चौधरी, ॲड स्वप्नील बागुल, पत्रकार प्रशांत मोरे, चित्रकार अनिल डावरे, अजित सावंत, विशाल ठाकरे, रेखा गुरव आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वरदा गोखले यांनी साने गुरुजी यांची ‘खरा तो एकची धर्म’, ही प्रार्थना कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर केली. सूत्रसंचालन अमेय रानडे यांनी केले. संपादक गिरीश त्रिवेदी यांनी प्रास्ताविक तर कार्यकारी संपादक मनीषा त्रिवेदी यांनी आभार मानले.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here