मुंबई,
“मुंबईतील ज्या कोळीवाड्यांचे सिमांकन झाले आहे त्याचे ६० दिवसात शहर विकास आराखड्यात मार्किंग करा.”असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिले आहेत.
कोळीवाडे आणि गावठाणांच्या सीमांकनाबाबत काल मंत्रालयातील दालनात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत झालेला निर्णय आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी जाहीर केला.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री शेलार यांनी सिमांकनाबाबत आढावा घेतला. त्यावेळी
या बैठकीत मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की,
मुंबई उपनगरातील २९ पैकी २३ कोळीवाड्यांचे सिमांकन झाले आहे. यापैकी ५ कोळीवाड्यातील रहिवाशांनी तक्रार केली होती की, सिमांमध्ये वाढ झाली आहे.त्यामुळे त्यांचे पुन्हा सिमांकन करण्यात आले. 6 कोळीवाड्यांचे सिमांकन बाकी आहे कारण त्यामध्ये काही भाग हा आदिवासी वस्तीचा आहे.
या सिमांकनात प्रक्रियेत 3 कोळीवाडे नव्याने सापडले, असेही त्यांनी नमूद केले.
मात्र सिमांकन होऊन ही डिपी मध्ये मार्किंग न केल्यामुळे कोळी बांधवांना घर दुरुस्ती करतानाही अडचणी येत आहेत,याकडे आमदार मनिषा चौधरी यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, “ज्या कोळीवाड्यांचं सीमांकन झालेलं आहे, त्या कोळीवाड्यांचं ६० दिवसांच्या आत डिपीमध्ये मार्किंग करा.” असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.
माजी खासदार गोपाळ शेट्टी जी, आमदार मनिषाताई चौधरी, उत्तर मुंबईतील भाजपा पदाधिकारी तसेच मुंबई महापालिका, एस आर ए, म्हाडा, मुंबई महापालिकेचे संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



















