Home नाशिक हरिनामाच्या जयघोषात श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला लागली चंदनाची उटी.

हरिनामाच्या जयघोषात श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला लागली चंदनाची उटी.

194
0

हरिनामाच्या जयघोषात श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला लागली चंदनाची उटी.

अनिल कुमार वैद्य, नाशिक त्र्यंबकेश्वर

हरिनामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी व गर्भगृहातील अन्य देवतांच्या मुर्तींना सुगंधी चंदनाची उटी लावण्यात आली. यावेळी हजारो वारकरी भक्ती रसात तल्लीन झाले होते.

       भुतलावरील सजीव सृष्टी प्रमाणे देवालाही वैशाखाचा दाह सुसह्य व्हावा या भक्तीभावनेतुन चैत्र वद्य एकादशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी व मंदिराच्या गर्भगृहातील विठ्ठल  रुक्मीणी, आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या  मुर्तीना चंदनाच्या उटीचे पारंपारीक पध्दतीने लेपन करण्यात येते. सुमारे दिडशे वर्षांपुर्वी एका वारकरी महिलेने हि परंपरा सुरू केली ती आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे.

   या निमित्त सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत गेले  ७ दिवस शेकडो महिलांनी ओवी अभंग गात दगडाच्या सहाणीवर चंदन घासुन उटी तयार केली. दुपारी ठिक २ वाजता टाळ मृदुंगाच्या साथीने अभंग गात संजीवन समाधी व इतर देवतांना उटी लावण्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी महामण्डलेश्वर डाॅ. रामकृष्ण महाराज लहवितकर, महामण्डलेश्वर ह.भ.प. रघुनाथ महाराज ओझरखेडकर तथा फरशीवाले बाबा, संस्थानचे अध्यक्ष  निलेश गाढवे, अॅड. सोमनाथ घोटेकर, विश्वस्त तथा दिंडीप्रमुख प्रा. अमर ठोंबरे, नारायण मुठाळ, ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, राहुल महाराज साळुंखे, ह.भ.प.  कांचनताई जगताप, श्रीपाद कुलकर्णी, माधवदास राठी, प्रसिध्दी प्रमुख नवनाथ गांगुर्डे, ह.भ.प. अनिल महाराज गोसावी, ह.भ.प. योगेश गोसावी, सच्चिदानंद गोसावी, माजी विश्वस्त पुंडलीक थेटे, ह.भ.प. पंडीत महाराज कोल्हे,  आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी हरिनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणुन गेला. यानंतर देवांना नवीन पोशाख करून साजशृंगार करण्यात आला. फळांचा नैवेद्य अर्पण करुन नाथांची आरती करण्यात आली. नाथांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास पन्नास हजार भाविक नगरीत दाखल झाले आहेत. रात्री ११ वाजता समाधीची विधिवत पुजा करुन देवतांना लावलेली उटी उतरल्यावर. ती टिपांमध्ये कालवुन भाविकांना प्रसादरूपी वाटण्यात येईल. भाविक ती उटी घेऊन कृतार्थ मनाने घरी परततील. या वारीसाठी शेकडो दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल झाल्या असुन ठिकठिकाणांहून किर्तनाचे सुर कानावर पडतात. पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, पो.उ.नि. प्रभाकर पवार व सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here