Home महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महिला परिषदेचे आयोजन*

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महिला परिषदेचे आयोजन*

102
0

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महिला परिषदेचे आयोजन*

*राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब राहणार उपस्थित*

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा व राज्यसभा खासदार फौजियाताई खान*

मुंबई

२०२९ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये महिला आरक्षण लागू झालाच पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्यादृष्टीने येत्या सोमवारी १६ जून २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे ‘महिला परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासह सर्व खासदार आणि आमदार तसेच संपूर्ण देशातील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित असणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय महिला अध्यक्षा तथा राज्यसभा खासदार फौजियाताई खान यांनी मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

फौजियाताई खान बोलताना म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील मोदी सरकारने नारी शक्ती वंदन विधायक लोकसभेमध्ये मंजूर केले होते या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देखील आम्ही पाठिंबा दिला होता. नारी शक्ती वंदन विधेयकाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी. त्यातील अटींसाठी कोणतीही कालमर्यादा नाही, त्याची पूर्तता कधी होईल ? महिलांना आरक्षण कधी मिळेल? याबद्दल महिलांमध्ये शंका आहे. असे फौजियाताई खान म्हणाल्या.

फौजियाताई खान म्हणाल्या की, आज देशभरात लैंगिक अत्याचार पासुन ते हुंडाबळी पर्यंत आणि कामाच्या ठिकाणच्या त्रासापासुन ते कौटुंबीक हिंसाचारा पर्यंत महिलांची परिस्थिती काय आहे हे आपणास ज्ञात आहेच. महिलांचे प्रश्न आणि त्यावरची उत्तरे एखादी महिलाच जास्त चांगल्या पध्दतीने समजु शकते. स्त्री दाक्षिण्य असलेले असंख्य पुरुष समाजात आहेत. परंतु जितक्या जास्तीत जास्त स्त्रिया पॉलिसी मेंकिंग मध्ये भाग घेतील. तितके महिलांवरचे अत्याचार, महिलांचे रोजगार, महिलांची सामाजिक परिस्थीती महिलांच्या सर्वच समस्यांची उत्तरे अधिक चांगल्या पध्दतीने मिळतील हे नक्की खरे आहे. आपल्या देशातील अर्धे नागरीक किंवा मतदार महिला आहेत. म्हणजे ४८ टक्के मग लोकसभेची खासदार म्हणून महिलांची संख्या १४ टक्के तर राज्यसभेमध्ये १३ टक्केच का? असे फौजियाताई खान यांनी बोलताना म्हटले आहे.

फौजियाताई खान म्हणाल्या की, लोकनेते शरद पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थे मध्ये ७३ व्या घटना दुरुस्ती करून देशात सर्वात प्रथम महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले. महिला सक्षम झाल्या. शरद पवार साहेबांनी दिलेल्या या संधीच महिलांनी सोनं केलं व गाव, तालुका, जिल्हा व नगरांचा कारभार प्रभावीपणे करु लागल्या. महिलांना संधी दिली तर त्या उत्तम काम करतात हा शरद पवार साहेबांचा विश्वास महिलांनी सार्थ ठरवला. महिलांना सन्मान असलेली उत्तम समाज व्यवस्था निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. असेही फौजियाताई खान यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना फौजियाताई खान म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीपूर्वी महिला विधेयक मंजूर करण्यात आले होते मात्र केंद्र सरकारने या विधायकात घातलेल्या तीन अटीमुळे हे या विधेयकाचा फायदा महिलांना २०२९ च्या निवडणुकीमध्ये देखील होणार की नाही यासंदर्भात महिलांमध्ये शंका आहे. आम्हाला माहिती नाही. म्हणूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आधाडीने देशभरात लोकसभा व विधान सभेसाठी महिला उमेदवार शोधुन त्यांना सक्षम करण्यासाठीचा महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जर एखादा कायदा आमच्या आयुषावर, भविष्यावर परिणाम करत असेल तर ते बनवण्याचा अधिकारही आम्हालाच मिळाला पाहिजे. आम्हा महिलांनी फक्त मतदार नाही. कायदे बनवणाऱ्या आमदार, खासदार, सुध्दा झाले पाहिजे. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण अधिक चांगले होण्यास नक्कीच मदत होईल. असे फौजियाताई खान यांनी सांगितले.

फौजियाताई खान म्हणाल्या की, आमची कुणाशीही भांडण किंवा स्पर्धा नाही. तर अतीशय नम्रपणे आमच्या हक्काची मागणी आहे. आम्ही आमच्यासाठी उभ्या राहण्यासाठी, आमचे भविष्य घडवण्यासाठी याची आता समस्त महिला वर्गाला गरज आहे. असे आम्हाला वाटते. आम्ही जर घराचे, कुटुंबाचे, संगोपन करु शकते, तर राज्याचे, देशाचे संगोपन का नाही करु शकणार? मग हे सत्ताधारी नारी शक्ती वंदन अधिनियमांची अमलबजावणी करण्यात नको त्या कारणामुळे दिरंगाई का करत आहेत?असेही फौजियाताई खान म्हणाल्या.

यावर सविस्तर बोलताना फौजियाताई खान म्हणाल्या की,नारी शक्ती वंदन अधिनियम अमलबजावणी लवकरात लवकर करावी. अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरुन सत्ताधाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आम्ही या महिला परिषदे द्वारे समस्त महिलांना संघटीत व्हा, संघर्ष करा, पॉलीसी मेकरव्हा, आणि या देशाला स्वतःसाठी, स्वत:च्या कुटुंबासाठी, स्वतःच्या मुलाबाळासाठी, अधिक चांगले बनवा. असे आवाहन करत आहोत. कारण भारत देशाला, आपल्या भारत मातेला, तिच्या सुपुत्रासोबत तिच्या कर्तबगार सुपुत्रीची सुध्दा आवश्यकता आहे. असे फौजियाताई खान यांनी बोलताना सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here