आज सकाळी मुंब्रा स्थानकाजवळ दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना घासल्याने लटकलेले आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या घटनेत 6 प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली!
दोन प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत ही प्रार्थना.
गेल्या अकरा वर्षापासून महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पायाभूत सुविधा आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर हेणार या पोकळ गप्पा ऐकत आहे. सुविधा आणि विकासाच्या नावाखाली टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात सुरु आहे. सत्ताधारी अधिकारी आणि ठेकेदार यातून गब्बर झाले आहेत. या भ्रष्टाचाराची किंमत मात्र सर्वसामान्यांना नागरिकांना आपला जीवाने चुकती करावी लागते आहे .
सरकारने आता तरी जागे होऊन, इव्हेंटबाजी सोडून मुंबईकरांचे लोकल प्रवासात जीव जाऊ नयेत यासाठी तातडीने पावले उचलावीत.
https://x.com/incharshsapkal/status/1931958520318214649?s=46



















