मराठी दिग्दर्शकाने संपवलं आयुष्य;गळफास घेऊन केली आत्महत्या,सिनेसृष्टीत खळबळ*
नागपूर- मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या रामकृष्ण मठातील एका गेस्ट रूममध्ये त्यांनी गळफास लावून आपले आयुष्य संपवले. डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने आयुष्य संपवत असल्याचा मेसेज त्यांनी स्वतःला पाठवला आणि त्यानंतर हा टोकाचा निर्णय घेतला. या भयंकर घटनेने सिनेविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी नागपूरच्या रामकृष्ण मठातील एका गेस्ट रूममध्ये आत्महत्या केली!
त्यांच्यावर कर्जाचा बोजा असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तशा आशयाचा मेसेज उबाळे यांनी स्वतःला व्हॉट्सॲप वर पाठविल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
नागपूरच्या रामकृष्ण मठामध्ये त्यांचा लहान भाऊ सारंग उबाळे हा सेवेकरी म्हणून काम करत होता. त्याला भेटण्यासाठीच आशिष उबाळे आले होते. ते गेस्टरुममध्ये मुक्कामी होते. त्यांनी मठामध्ये जेवण केले आणि दुपारी आराम करतो असे सांगून रुममध्ये गेले. सायंकाळी त्यांचा भाऊ सारंग त्याला उठवण्यासाठी गेला असता त्यांनी रूमचा दरवाजा उघडला नाही, त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.*
याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आशिष उबाळे यांनी स्वतःला व्हाट्सअपवर स्वतःला एक नोट पाठवली आहे ज्यामध्ये कर्जामध्ये असल्याने आयुष्य संपवल्याचे म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.
*कोण आहेत आशिष उबाळे*
आशिष उबाळे यांनी अग्नी, एका श्वासावे अंतर, किमयागार अशा मालिकांची निर्मिती केली आहे. तसेच गार्गी, प्रेमासाठी वाटेल ते, बाबुरावला पकडा या चित्रपटांचीही निर्मिती केली . महत्वाचे म्हणजे आशिष उबाळे यांचा एक तरुणी आणि तिचा भाडोत्री नृत्य-जोडीदार यांची कहाणी असलेला ‘गार्गी’ नावाचा त्यांचा चित्रपट 2009 साली नागपूर येथे भरलेल्या कार्लस्बर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेला होता.*


















