Home मुंबई *राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची...

*राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती…*

24
0

*राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती…*

*राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार…*

मुंबई दि. ३१ ऑगस्ट – राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर पार पडली.

या शिबिरामध्ये सुमारे ७०० ते ७५० प्रमुख नेते, निमंत्रित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना बोलावणार आहोत. यामध्ये सर्व जिल्हाध्यक्ष, महानगर प्रदेश यातील प्रमुखांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूकांसाठी पक्षाचे वरीष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावर मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. दिलीप वळसे पाटील हे राज्यातील २२ जिल्हयात होणाऱ्या निवडणुकीत समन्वयकाचे काम करतील. यामध्ये दौरे करावेत आणि काही सहकाऱ्यांनासोबत घेऊन मर्यादित कालावधीत पक्ष मजबूतीसाठी एक आराखडा तयार करावा अशा सूचनाही सुनिल तटकरे यांनी दिल्या.

 

बीएलओ आणि एसआयआर संदर्भात पक्षाने ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रमुख समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या समवेत अनिल भाईदास पाटील यांची सहसमन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संकलित करून पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन अंमलबजावणी किंवा त्रुटी राहिल्या असतील तर त्या दूर केल्या जातील असे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

 

२७ सप्टेंबर रोजी पक्षाचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर होणार आहे त्याचा अजेंडा व विचारमंथन लवकरच करणार आहोत असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

या राज्यव्यापी शिबिराचा अजेंडा आम्ही बसून तयार करत आहोत. त्यातून एक व्यापक कार्यक्रम राज्यातील तरुणाईमध्ये घेऊन जाणार आहोत. स्वर्गीय अजितदादा संपूर्ण तरुणाईचे लोकप्रिय नेते होते. त्यामुळे त्यांचे विचार पुढे घेऊन जात असताना तो विचार अजेंड्यावर नक्कीच असणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here