Home मुंबई *२१ ऑगस्टला महाराष्ट्रभर ‘महा वॉकेथॉन’ : ४ हजार पावले पाण्यासाठी*

*२१ ऑगस्टला महाराष्ट्रभर ‘महा वॉकेथॉन’ : ४ हजार पावले पाण्यासाठी*

26
0

एक पाऊल तुमचे, एक थेंब भविष्यासाठी: वरळीहून सुरू होणार महा वॉकेथॉन`

*मुंबई :* बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि घटत्या भूजलामुळे जलसंधारणाची गरज अधोरेखित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे.

“एक पाऊल तुमचे, एक थेंब भविष्यासाठी!” या संदेशासह सकाळी ६ वाजता मुंबईतील वरळी सी फेसपासून ते गावागावांपर्यंत नागरिक ३ किलोमीटर म्हणजेच सुमारे ४ हजार पावले जलसंधारणासाठी चालणार आहेत.

*वरळी सी फेसवर राज्यस्तरीय कार्यक्रम*
मुंबईतील मुख्य कार्यक्रम *बिंदू माधव प्रवेश द्वार, वरळी सी फेस, प्रोमेनेड* येथे होणार आहे. या वॉकेथॉनमध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कलाकार, खेळाडू, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक संस्थांसह हजारो नागरिक सहभागी होणार आहेत.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी जिल्हास्तरीय वॉकेथॉन होईल.

*उद्देश: लोकचळवळ उभी करणे*
पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संधारण, पाणी अडविणे, पाणी जमिनीत जिरविणे, भूजल पातळी वाढविणे, मातीची धूप रोखणे आणि जलस्रोतांचे संवर्धन याबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट्स, रेड क्रॉस आणि विविध स्वयंसेवी संस्थाही यात सहभागी होणार आहेत.

*नोंदणी आणि बक्षिसे*
सहभागासाठी QR कोडद्वारे ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. सहभागी प्रत्येक नागरिकाला ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.
*प्रथम पारितोषिक: ₹२५,०, द्वितीय: ₹१५,०००, तृतीय: ₹१०,०००* आणि ७ विशेष बक्षिसे प्रत्येकी ₹३,०.
अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यात ₹७१,००० पर्यंत बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम १० विजेत्यांना गौरवचिन्हही दिले जाणार आहे.

*१५ ऑगस्टपासून जलसंधारण अभियान*
महा वॉकेथॉन हा मोठ्या अभियानाचा भाग आहे. १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ पर्यंत व्यापक जलसंधारण अभियान राबवले जाणार आहे. या काळात पाणी जिरविणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पाण्याचा काटकसरीने वापर यावर भर दिला जाणार आहे.

*कार्यक्रमाची माहिती*
*दिनांक*: २१ ऑगस्ट २०२६, सकाळी ६ वा.
*स्थळ*: बिंदू माधव प्रवेश द्वार, वरळी सी फेस, मुंबई
*अंतर*: ३ किमी | *संकल्प*: ४ हजार पावले पाण्यासाठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here