Home दिल्ली *खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याचा संसदेने कायदा करावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास...

*खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याचा संसदेने कायदा करावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

28
0

*खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याचा संसदेने कायदा करावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*देशव्यापी विस्तारासह राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रिपब्लिकन पक्ष मिळवणार : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

नवी दिल्ली
सरकारी क्षेत्रात जसे अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींना आरक्षण लागू आहे तसेच खाजगी क्षेत्रात ही आरक्षण लागू करण्याचा कायदा संसदेने करावा असा ठराव आज रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीत करण्यात आला. खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याचा ठराव संसदेने करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नवी दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांनी सांगितले की, आगामी काही वर्षांत रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देणे हे पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि यासाठी संघटनेचा देशव्यापी विस्तार व जनाधार वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार न्यू महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ना.रामदास आठवले यांनी सांगितले की, नागालँडमध्ये दोन विधानसभा जागा जिंकणे तसेच मणिपूरमध्ये पक्षाची चांगली कामगिरी झाल्यानंतर दोन राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाला राज्यस्तरीय पक्षाची मान्यता यापूर्वीच मिळाली आहे आणि सर्व २८ राज्ये तसेच ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये संघटना सक्रिय आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी संघटनेची सद्यस्थिती, आगामी कार्ययोजना आणि विविध राज्यांमध्ये पक्षाच्या विस्ताराबाबत सविस्तर चर्चा केली.

ना. रामदास आठवले यांनी सांगितले की, पक्ष लवकरच २कोटी नवीन सदस्य जोडण्यासाठी देशव्यापी सदस्यत्व अभियान सुरू करणार आहे. याचा उद्देश केवळ सदस्यसंख्या वाढवणे नसून, प्रत्येक राज्य, जिल्हा, विधानसभा क्षेत्र आणि बूथ स्तरापर्यंत पक्षाची मजबूत आणि सक्रिय संघटनात्मक रचना तयार करणे हा आहे.

ना. रामदास आठवले यांनी सांगितले की, ‘भारतरत्न’ आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे रिपब्लिकन पक्षाच्या वैचारिक शक्तीचे आणि सामाजिक न्यायाच्या राजकारणाचे आधार आहेत.
पक्ष बाबासाहेबांच्या संविधान, समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या संदेशाचा देशातील प्रत्येक वर्गापर्यंत प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे.

ना. रामदास आठवले यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले की, त्यांनी जनतेच्या स्थानिक समस्यांना प्राधान्य द्यावे, सर्वसामान्य नागरिकांशी सातत्याने संवाद प्रस्थापित करावा आणि संघटनेला जनसेवेचे प्रभावी माध्यम बनवावे. ना.रामदास आठवले यांनी सांगितले की, रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय स्तरावर एक सशक्त राजकीय पर्याय म्हणून प्रस्थापित करण्यात प्रत्येक कार्यकर्त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

ना. रामदास आठवले जी यांनी सांगितले की, रिपब्लिकन पक्ष अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, शेतकरी, कामगार तसेच समाजातील व इतर वंचित घटकांच्या अधिकारांसाठी ठामपणे आवाज उठवत राहील.

या प्रसंगी राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सर्व राज्यांचे प्रभारी तसेच सर्व प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here