Home मुंबई विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि देशातील व्यवस्था बदलण्यासाठी आता जनतेने एकजूट होण्याची...

विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि देशातील व्यवस्था बदलण्यासाठी आता जनतेने एकजूट होण्याची वेळ आली आहे,” उध्दव ठाकरे

98
0

 

, “विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि देशातील व्यवस्था बदलण्यासाठी आता जनतेने एकजूट होण्याची वेळ आली आहे,” असे ठाम मत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले.

आज, रविवार दि. १९ जुलै रोजी, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर देशातील तरुणांच्या न्याय्य आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने एकवटले होते

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या विराट आंदोलनात तरुणांसह पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

देशातील शिक्षण व्यवस्थेतील वाढता भ्रष्टाचार, परीक्षा प्रक्रियेतील अनागोंदी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला खेळ याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तसेच, सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकारने केलेले दुर्लक्षही यावेळी निषेधार्ह असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी, “विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि देशातील व्यवस्था बदलण्यासाठी आता जनतेने एकजूट होण्याची वेळ आली आहे,” असे ठाम मत व्यक्त केले.

या आंदोलनाला युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार, आमदार तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here