१.*”मुंबईच्या माईची मागणी- जीवाचा आणि ताटाचा हिशोब द्या”*
— *शीतल हरीश करदेकर*
आदरणीय पालक विश्वस्तांनो,
मी मुंबईची माई.
माझ्यासारख्यांच्या मताने तुम्हाला ‘जबाबदारी’ दिली.
आमच्या *३०,००० कोटी* टॅक्सने आणि *महागाईने* तुुमचा पगार आणि शहर चालतं.
भाग १: जीवाचा हिशोब. गेल्या ६ वर्षात मुंबईत मॅनहोल आणि उघड्या गटारात पडून १५+ लोकं गेली.
चेंबूरमध्ये शालेय बसवर झाड पडून एक चिमुकला गेला.
परवा साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून दुसरा जीव गेला.
आम्ही गेलेले जीव खांद्यावर घेत होतो…
आणि तुम्ही सभागृहात “भ्रष्टाचार किती टक्के चालेल”
यावर चर्चा करत आणि हसत होता.
विश्वस्तांनो, संविधानाच्या कलम २१ नुसार
प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जगण्याचा अधिकार आहे.
मग आमच्या मुलांचा अधिकार कुठे गेला?
भाग २: ताटाचा हिशोब
“भाजीच्या पिशवीत आता ‘भाव’ दिसतो, ‘भाजी’ नाही”
वांगी ८०, टोमॅटो १००, कोथिंबीर ४० ला जुडी, लसूण ३००, कांदा ६०.
पगार १०% ने वाढला, पण भाजीचे भाव १००% ने वाढले.
गृहिणीचं बजेट कोलमडलं, पण ‘हिशोब’ कोण देणार?
‘कर’ देऊनही ‘ताट’ रिकामे का?
१. डिझेल महाग = वाहतूक महाग = भाजी महाग_
२. मंडई गेली, माॅल आला, दलाल वाढले.
३. कोल्ड स्टोरेज नाही, फक्त ‘सेस’ आहे_
४. निसर्गाची मार, विम्याचा लाभ नाही_
५. ‘स्मार्ट सिटी’ ची जाहिरात कोट्यवधींची, शेतकऱ्याला पाणी महाग
*एकूण ४ प्रश्न आहेत:*
१. महागाईने कंबरडं मोडलं – तरी सुविधा नियोजन का नाही?
२. ४००० कोटी नालेसफाईचे गेले कुठे? नाले, की जाहिराती?
३ तुमच्या. विश्वासावर असलेले जीव कोण वाचवणार? टोलेबाजी, की झाडांची छाटणी?
४. “चोरी थोडीशी चालते” हा कोणत्या कायद्यात आहे?
तुम्ही आमचे मालक नाही.
तुम्ही आमचे पालक विश्वस्त आहात.
विश्वास तोडाल… पण लक्षात ठेवा,
माईची तळतळ, महागाई आणि मत दोन्ही पिढ्यानुपिढ्या चालतं.
आता ‘टक्के’ नकोत.
आता ‘जबाबदारी’ द्या. नाहीतर ‘राजीनामा’ द्या.
*मुंबईची माई*
तुमच्या एरियात आज भाजी काय भाव आहे? आणि तुमच्या गल्लीत मॅनहोल झाकण आहे का? 👇
#मुंबईच्या_माईचा_आवाज #पालक_विश्वस्त #महागाईचा_भडका #कलम21 #हिशोबद्या #4000कोटी #भाजीभाव #जबाबदार_कोण #शीतल हरीश करदेकर
—



















