Home महिला *अशय सोशल ग्रुप च्या सीमा खंडाळे यांची ‘ऋतू’ बदलून सन्मान देणारी चळवळ*

*अशय सोशल ग्रुप च्या सीमा खंडाळे यांची ‘ऋतू’ बदलून सन्मान देणारी चळवळ*

85
0

*’मासिक पाळी आली की शाळा बुडवायची’* – ही हजारो मुलींची व्यथा! पण *डॉ. सीमा खंडाळे, अध्यक्षा अशय सोशल ग्रुप* यांनी २०१५ पासून ही कहाणी बदलायला सुरुवात केली. आजमितीला त्यांचे काम धुळे-चोपड्याच्या खेड्यापासून श्रीनगर-बडगुमपर्यंत पोहोचले आहे.

*२०१५ ला कापडी पिशवीपासून सुरुवात*
जुन्या साड्यांपासून कापडी पिशव्या बनवून महिलांना उपजीविका दिली. आतापर्यंत *३८,००० पिशव्यांचे वाटप* करून प्लास्टिकमुक्तीचं पहिलं पाऊल टाकले.
*’ऋतू कप’: मेड इन महाराष्ट्र*
मेन्स्ट्रुअल कपचा स्वतः अनुभव घेतल्यावर डॉ. खंडाळे यांनी *‘ऋतू कप’ हा ‘मेड इन महाराष्ट्र’* कप डिझाइन केला. सोबतच कापडी सॅनिटरी पॅड्सची माहिती घरोघरी पोहोचवली. उद्देश एकच – प्लास्टिक पॅडला शाश्वत पर्याय देणे हा होता.
*डिसेंबर गिव्हिंग कॅम्पेन: २०२३ ते २०२५*
मासिक पाळी आरोग्य जनजागृतीसाठी अशयने ठोस काम केलं:
● धुळे – निमखेडी | २६ जानेवारी २०२३
२७० मुली व महिलांना प्रत्येकी चार ‘ऋतू’ कापडी पॅड संच मोफत. स्वच्छता, पुनर्वापराचे फायदे यावर मार्गदर्शन केले.
● माहेरवाशीण मेळावा | मे २०२३*
सनाथ वेल्फेअर फाउंडेशनसोबत ११५ किशोरींना कापडी पॅड संच. आधार नसलेल्या महिलांसाठी विशेष उपक्रम केला.
● मुंबईतील शाळा | २०२३
अंधेरीतील R.S.T आणि होली फॅमिली हायस्कूलमधील इयत्ता ६ वी ते ९ वीच्या २०० मुलींना पॅड संच दिले व जनजागृती केली.
● . महाराष्ट्र ते काश्मीर | २०२५
चिमूर, दुगानी, तसेच *श्रीनगर आणि बडगूम* येथे मिळून ५०० महिलांना कापडी पॅड व आरोग्य सत्रे केली.
*या सगळ्यानेकाय बदल घडला?* तर
अशयच्या कामाचे ४ ठळक परिणाम दिसले-
*आर्थिक:* दरमहा पॅडचा शेकडो रुपयांचा खर्च वाचला.
*आरोग्य:* प्लास्टिक पॅडमुळे होणारे इन्फेक्शन, रॅशेस कमी झाले.
*शिक्षण:* पॅडअभावी शाळा बुडवणाऱ्या मुली नियमित शाळेेत येऊ लागल्या.
*पर्यावरण:* हजारो प्लास्टिक पॅड डम्पिंगवर जाण्यापासून वाचले.
याहूनही *सर्वात मोठा बदल म्हणजे संकोच संपला!* महिला आता मासिक पाळीवर मोकळेपणाने बोलतात. त्यांच्यातला आत्मविश्वास आणि स्वाभिमान वाढला आहे.

*डॉ. सीमा खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली* अशय सोशल ग्रुप ग्रामीण-शहरी भागात थेट पोहोचून काम करत आहे. महिलांचे आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबन या तिन्ही बाबी त्यांच्या कामाच्या केंद्रस्थानी आहेत.

*’ऋतू कप’ किंवा कापडी पॅड हे फक्त उत्पादन नाही. तो आहे हजारो महिलांच्या सन्मानाने जगण्याचा हक्क.*
—-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here