दि ५ ऑक्टोबर रोजी रविवारी नागपुरमध्ये होणार सन्मान सोहळा !
हजारो वर्षांपुर्वी मानव विकास व कल्याणासाठी सखोल संशोधन व ग्रंथसंपदा निर्माण करून भारतीय संस्कृतीचे समृद्ध दर्शन घडवणाऱ्या ऋषीमुनींच्या नावे
“हिंदू रिसर्च फाउंडेशन”
या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने दरवर्षी नोबेल पुरस्कारांच्या समकक्ष सप्तऋषी पुरस्काराची शृंखला सुरू केलेली आहे.
माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक, रेड स्वस्तिक सोसायटी चे महाव्यवस्थापक,
हिंदू रिसर्च फाउंडेशन चे संस्थापक डॉ.टी.एस.भाल (IPS) यांच्या संकल्पनेतून
सन २०२२पासून “हिंदू रिसर्च फाउंडेशनच्या” माध्यमातून
आचार्य भारद्वाज,
आचार्य नागार्जुन,
आचार्य विश्वकर्मा,
आचार्य कनाद,
महर्षी वाल्मिकी,
आर्यभट्ट,
आचार्य सुश्रुत
या ऋषीमुनींच्या नावाने हे पुरस्कार सुरू करण्यात आले असून यावर्षीच्या सप्तऋषी पुरस्कार मध्ये
१) ख्यातनाम रसायन अभियंता व संशोधक आय सी टी चे संचालक
पद्मविभूषण प्रोफेसर एम.एम. शर्मा यांना नागार्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून
२) सामाजिक समरसता आणि भटके विमुक्त विकास परिषदेचे संस्थापक, विवेक मासिकाचे संपादक पद्मश्री. रमेश पतंगे यांना महर्षी वाल्मिकी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
३) डी आर डी ओ चे संचालक “ऑपरेशन सिंदूर” मध्ये पाकिस्तानची मिसाईल यंत्रणा नष्ट करणाऱ्या “आकाश मिसाईल” चे निर्माते
पद्मश्री प्रल्हाद रामराव यांना
आचार्य भारद्वाज पुरस्काराने
सन्मानित करण्यात येणार आहे
४) प्रसिद्ध अनुशास्त्रज्ञ, डॉक्टर होमी भाभा विद्यापीठाचे मा. कुलगुरू पद्मश्री डॉ. रवी ग्रोव्हर यांना आचार्य कनक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
५)शुश्रुत पुरस्कार विदर्भातील प्रसिद्ध सेवाभावी,डॉक्टर कुष्ठरोग्यांची जटिल शस्त्रक्रिया करणारे डॉ. अनिल गोल्हार यांना आचार्य शुश्रुत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
६) जगातील रेल्वेचा सर्वात उंच पूल म्हणून प्रसिद्ध असलेला “चिनाब नदी”. वरील पुलाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचे तांत्रिक योगदान प्रो.डॉ. माधवी लता यांचे आहे. ज्यामुळे जम्मू-काश्मीरमधील काश्मीर घाटीला भारताच्या मुख्य भूमीशी जोडण्याचा महत्त्वाचा दुवा ठरला असून त्यामुळे व्यापार, पर्यटन आणि सामाजिक विकासाला चालना मिळालेली आहे. प्रोफेसर डॉ. माधवी लता यांना विश्वकर्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
७) गणिताच्या दोन अत्यंत गुंतागुंतीच्या शाखांमध्ये अल्जेब्रिक जॉमेट्री आणि डिफरेन्शियल जॉमेट्री यांना एकत्र आणून जगाला नवीन दृष्टिकोन दिल्यामुळे अत्यंत जटिल भूमितीय रचनेचा अभ्यास सखोल झाला. त्यामुळे
भारतातील गणितातील संशोधन जागतिक पातळीवर दखलपात्र झाले.
गणित आणि भौतिकशास्त्र यांना जोडणारे नवे मार्ग ज्यांच्या तंत्रज्ञानामुळे उघडले गेले त्या
प्रोफेसर इंद्रनील विश्वास यांना “आर्यभट्ट” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून
श्रीमहर्षी रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक टेक्नॉलॉजी गुंटूर आंध्र प्रदेशचे
संस्थापक संचालक मा. वेदश्री. ए. बी. एस. शास्त्री यांच्या सह माजी कुलगुरू डॉ. श्री. वेद प्रकाश मिश्रा यांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांना दि. ५ ऑक्टोबर २०२५ रविवार रोजी
कवी कुलगुरू कालिदास सभागृह
परसिस्टन्स आयटी पार्क नागपूर
येथे सकाळी ११ वाजता
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत
एक लक्ष रुपये रोख,
सन्मान पत्र सन्मान चिन्ह शाल, श्रीफळ देऊन सन्मान पूर्वक प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.
अशी माहिती हिंदू रिसर्च फाउंडेशन चे विश्वस्त अशोक एस.शिदे , तुषार भाल, जे.बी.पाटील, श्री. प्रमोद नांदगावकर , ज्ञानदीप पाटील , योगेश गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यापूर्वी हिंदू रिसर्च फाउंडेशन च्या वतीने
७५ विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवणारे पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर,
पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर,
मंगळावर गेलेल्या मंगळयान इंजिनाचे निर्माते पद्मभूषण एस नंबीनारायण,
रेल मॅन पद्मविभूषण डॉ.इ.श्रीधरण ,
भारतरत्न डॉ. सी.एन.आर.राव,
पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंजन,
पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर,
पद्मभूषण डॉ. विजय भाटकर,
पद्मभूषण डॉ.एस.एल.भैरप्पा,
पद्मश्री डॉ.गणपती यादव
डॉ. अनमोल सोनवणे,
महाकवी सुधाकर गायधनी,
पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर,
पद्मश्री एस. अरुण
सी. बी. सोमपुरा
मोहित जोशी
या मान्यवर शास्त्रज्ञ, साहित्यिक आणि संशोधकांना प्रदान करण्यात आलेला आहे.
मानव कल्याणा साठी हजारो वर्षांपूर्वीची भारतीय संस्कृती किती समृद्ध प्रगल्भ आधुनिक व जगातील सर्वश्रेष्ठ होती.
यासाठीच “हिंदू रिसर्च फाउंडेशन” कार्यरत आहे.
या उपक्रमांना रेड स्वस्तिक सोसायटी, विश्व मांगल्य सभा, मैत्री परिवार संस्था यांचे विशेष सहकार्य लाभत आहे


















