Home Trending Now आरोग्य यंत्रणा फासावर !सगळे च अनियंत्रित! केईएमसह सर्व हाँस्पिटल्सची युध्द पातळीवर रेकी...

आरोग्य यंत्रणा फासावर !सगळे च अनियंत्रित! केईएमसह सर्व हाँस्पिटल्सची युध्द पातळीवर रेकी व सुधारणा होणे आवश्यक! कुणा कुणावर कारवाई करणार? १)इमरजन्सी वाँर्ड म्हणजे थेट वरची वाट! उपचाराविना तडफडत जीव गेलेला पेशंट! २)असे बाळंतपण नको देवा! कँन्सर पेशंट महिलेवर असहनीय अन्याय! मयत महिलेच्या पतीचे उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांना पत्र!

1120
0

   आरोग्य यंत्रणा फासावर !सगळे च अनियंत्रित!

केईएमसह सर्व हाँस्पिटल्सची युध्द पातळीवर रेकी व सुधारणा होणे आवश्यक!
कुणा कुणावर कारवाई करणार?
१)इमरजन्सी वाँर्ड म्हणजे थेट वरची वाट!
उपचाराविना तडफडत जीव गेलेला पेशंट!
२)असे बाळंतपण नको देवा!
कँन्सर पेशंट महिलेवर असहनीय अन्याय!
मयत महिलेच्या पतीचे उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांना पत्र!
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महिला बाल कल्याण मंत्री यांनाही निवेदन!
(शीतल हरीष करदेकर)
दि १४जानेवारी२०२५ला पहाटे४ला (८तास उपचाराविना तडफडून थंड पडलेल्या) हरीष रामचंद्र करदेकर यांना आँक्सिजन लावले .
थंड स्ट्रेचरवर ब्लडप्रेशर वाढण्याची प्रतिक्षा .. यंत्रणेला हलवल्यावर सकाळी ७दरम्यान वेन्टिलेटर काढला गेला.त्याच दिवशी वाँर्ड नं २०मधे खूप काही घडलं..
एक जीव बळी गेला.
आता आणखीन भयंकर घटना समोर आली.
 मृत सौ.तेजस्विनी किरण पाटील सोबत त्यांचा १ महिन्याचा प्रीमॅच्युअर्ड मुलगा यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांचे पती किरण नरेंद्र पाटील यांच्या सोबत  घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे.
केईएम मधे मोठ्या सोई मोठे डॉक्टर्स आहेत म्हणून पेशंट इथे येतात! पण इथे तसं काही नसून इथल्या डॉक्टर्स व यंत्रणेच्या हाती असलेली छळ छावणी आहे.
इथे आजारी माणूस योग्य उपचारासाठी तडफडतो.
अपुरी मशिनरी ,औषधाच आणि सगळंच दुष्टचक्र, मोठं रेकेट!
योजना कागदोपत्री मंजुर  होते पण लाभ होतं नाही!
औषधे नाही . मग याचं पुढे काय,पेशंटसाठी आणलेली औषधं,प्लेटलेट्स, रक्त याचा उपयोग पेशन्टसाठी झाला नाही तर पुढे काय?
पेशंट ला घाबरवणारे डॉक्टर तो मरणार ,रिपोर्ट येण्याआधी भाकीत कसं करतात?
बाळंतपण डिलेवरी रूममध्ये न होता दुसऱ्या वाँर्ड मधे इतर पेशंट च्या नातेवाईकांसमोर का होते सीसी टिव्ही त रेकॉर्ड का होते?
तिथेच आंघोळ घालण्याची जबरदस्ती पुरुष व महिला डॉक्टर कशी करु शकतात?
बोनमँरो.चं दुकान सूरु आहे…
अशी खूप भयंकर मनमानी छळणारी अपमानित करणारी राक्षसी जमात इथे कार्य रत आहे.
या यंत्रणेला समुद्राच्या खाऱ्या पाण्यात बुडवून किडे माज साफ करुन संवेदनशील चांगल्या देव माणसांची व्यवस्था करण्याची युद्ध पातळीवर आवश्यकता आहे.
सरकारने फक्त योजना घोषणा,उद्घाटन करून आपले 
काही आरोग्य दूत पगारी दलाल ठेवून चालणार नाही.
इथे सगळा हमामच नंगा काळाकुट्ट आहे ;काही अपवाद.वगळता!इथे.खड्यातले च़ांगले तांदूळ वेचून काम पूढे नेणे आवश्यक आहे.
अनियंत्रित यंत्रणा नियंत्रणात आणण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा!
अशी भयंकर परिस्थिती मनपा व सर्व हाँस्पिटल्सची आहे.
तितक्याच ताकदीने काम करणाऱ्या मंत्री सरकारी अधिकाऱ्यांची आहे. 
इथे.पार्टटाइम प्रशासन नको।२४ तासाचे संवेदनशील नियंत्रण करणारे अधिक्षक हवेत!
 मृत सौ.तेजस्विनी किरण पाटील सोबत त्यांचा १ महिन्याचा प्रीमॅच्युअर्ड मुलगा यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांचे पती किरण नरेंद्र पाटील यांच्या सोबत  घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे.
ज्या प्रकारे गरोदर व कँन्सरची लक्षणे दिसलेल्या तेजस्विनी पाटील यांच्या वर उपचार केले गेले.
जननी सुरक्षा योजना,राजीव गांधी योजना, कँन्सर पेशंट एड या सगळ्या त योजना लागू करूनही औषधे इंजेक्शन नाही. मिळालेल्या इजेक्शन चा उपयोग डॉक्टर करत नाही.
एमआयसीयू वॉर्ड मधील झालेली डिलेवरी तेथील सर्वलोकांनी पाहिली सीसी टीव्ही त रेकॉर्ड झाली.
डिलिव्हरी होऊ लागली तेव्हा डॉक्टर व नर्स उपस्थित नाही
डिलेवरी वेळी रक्त प्लेटलेट्स सतत चढवावे लागणार असं सांगितलं होत़.पण ते चढवले गेले नाहीत. 
डिलेवरीनंतरची घाण तिच्या नातेवाईकानी साफ केली. खराब चादरीवर तशीच दोन दिवस ठेवण्यात आले.
• कॅन्सर चे सिम्प्टम झालेल्या पेशंटला त्याला कॅन्सर झालेला आहे आणि त्याला कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट करणार आहे हे तुम्ही टेस्ट चे रिपोर्ट येण्याआधी कसे काय सांगू शकता?
• महिला पेशंटला जागेवर म्हणजे २ बेड च्या मध्ये टब ठेऊन अंघोळ करायला डॉक्टर कल्पिता यांची जबरदस्ती करणे कितपत योग्य होते आणि ते हि एमआईसीयू मध्ये ? आम्ही नकार दिल्यावर आमच्यावर जबरदस्ती पद्धतीने हे झालच पाहिजे असं स्वतः महिला असलेल्या डॉक्टर कल्पिता कसे सांगू शकतात ? महिलांचा काही मान सन्मान ठेवण्याची पद्धती बंद झाल्या आहेत का?
• बोन मॅरो इतका उर्जेन्ट होता का जो डिलेव्हरी च्या दिवशीच करायचा होता नाहीतर तिचा जीव जाऊ शकतो?
• किमो थिरपी कोणत्या आधारावर लावला गेला कारण रिपोर्ट तर १७-१८ दिवसानंतर येणार होता?
• प्लेट्सलेट्स मुळे जेव्हा अंगावर रिअक्शन झाले तेव्हा इंजेकशन मारायचं होत. १५ मिनिट इंजक्शन शोधत बसले आणि जेव्हा विचारणा केली 
 तेव्हा बाहेरून विकत घेऊन या कारण इथे आम्हाला ते  भेटत नाही आहे शिवाय भेटलं तरी ते खूप जून असणार आहे. (अरे हे हाँस्पिटलं आहे की भंगार खाना)
• युरिक ऍसिड टेस्ट साठी डॉक्टर कल्पिता यांनी लॅबोरेटरी मध्ये युरीन पाठवली, टेस्ट वाल्यानी पेशंटच्या नातेवाईकांना  मूर्खात काढलं! ज्यासाठी रक्त लागत त्या टेस्ट साठी तुम्ही युरीन आणता. 
• जननी सुरक्षा योजना आणि राजीव गांधी योजना ऍक्टिव्ह करून सुद्धा  त्या योजनेमार्फत कोणतीच औषध दिली नाही आणि त्यामुळे  आईला घरी नेण्यात आलं.
नंतर त्या जग सोडून गेल्या
*किरण पाटील यांनी दिलेली माहिती*
KEM HOSPITAL FILE REF NO. :
INPATIENT RECORD: 25/785 DATED 04.01.2025
OPD NO.25/1533 DATED 04.01.2025
पीडित मृत महिला : कै.सौ.तेजस्विनी किरण पाटील सोबत माझा १ महिन्याचा प्रीमॅच्युअर्ड बाळ यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल न्याय मिळण्याबाबत….
नमस्कार
मी. किरण नरेंद्र पाटील, राहणार, भिमाबाई सदन, आगरी समाज हॉल मागे, घाटला गाव, चेंबूर, मुंबई – ४०००७१
मी आपल्याला या माहितीमध्ये, जे काही गेल्या २० दिवसांपासून माझ्या तसेच माझी मृत पत्नी कै.सौ.तेजस्विनी किरण पाटील व माझ्या १ महिन्याच्या बाळासोबत जे काही घडलं त्याची सविस्तर माहिती देत आहे. माझी विनंती आहे की आपण संपूर्ण माहिती ऐकून घ्याल व आम्हाला योग्य न्याय द्याल.
आमच्या लग्नाला १७ फेब्रुवारी २०२४ मध्ये दहा वर्षे पूर्ण झाली. परंतु आम्हाला एकही मूलबाळ झालेलं नव्हतं. अचानक देवाच्या कृपेने गेल्या मे २०२४ मध्ये आम्हाला आनंदाची बातमी मिळाली की माझी पत्नी गर्भवती आहे. त्यानंतर लगेचच आम्ही ट्रीटमेंट सुरु केली. आम्हाला डिलेव्हरी ची तारीख १७ फेब्रुवारी २०२५ दिली. सगळं व्यवस्थित सुरू होतं.
पण १ जानेवारी २०२५ या दिवशी संध्याकाळी माझ्या पत्नीच्या पोटात दुखायला लागलं. मग आम्ही त्याच दिवशी रात्री डॉक्टर कडे घेऊन गेलो. त्यावेळी त्यांनी काही औषध दिली आणि थोड्या वेळाने बरं वाटू लागले. दोन तारखेला रात्री पुन्हा पोटात दुखायला सुरू झालं आणि सोबत ब्लीडिंग सुद्धा सुरू झाली तेव्हा आम्ही खूप घाबरलो आणि डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांनी आम्हाला त्वरित यायला सांगितलं आणि लगेचच त्यांनी ऍडमिट करून घेतलं. दुसऱ्या दिवशी ३ तारखेला सोनोग्राफी केली आणि त्यात असं आढळून आलं की पिशवीतलं पाणी खूपच कमी झालेल आहे आणि आपल्याला एक ते दोन दिवसांमध्ये प्रीमॅच्युअर्ड डिलिव्हरी करावी लागेल. आम्ही त्यांना लगेच सांगितलं की आपण प्रीमॅच्युअर्ड डिलिव्हरी करूया. त्याच वेळेला त्या डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट साठी सॅम्पल पाठवलं होतं. ४ तारखेला डिलिव्हरीच्या दिवशी सकाळी ब्लड रिपोर्ट आला आणि आमची पायाखालची जमीन सरकली, कारण तो रिपोर्ट खूपच भयानक होता. त्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे कॅन्सरचे काही सिम्प्टम्स दिसत होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला सजेशन दिलं की, आपल्याला डिलेव्हरी साठी मल्टिपर्पस इन्स्टिट्यूट लागेल जिथे सर्व उपचार एकाच ठिकाणी होतील. आम्ही विचारपूस केली तेव्हा आम्हाला कळलं कि ही ट्रीटमेंट केईएम हॉस्पिटलमध्ये योग्य होईल. म्हणून आम्ही त्याच दिवशी ४ तारखेला केइएम हॉस्पिटल मध्ये जाऊन त्वरित ऍडमिशन घेतलं.
केईएम हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन घेताना तेथील डॉक्टरांनी आम्हाला खूप घाबरवलं. त्यांनी सांगितलं कि खूप क्रेटीकल केस आहे आणि आमच्यासमोर कंडिशन ठेवली की जर सिजर केलं तर माझ्या पत्नीचा मृत्यू 100% होईल आणि बाळ प्रीमॅच्युअर्ड असल्यामुळे त्याची सुद्धा कोणतीही जबाबदारी घेऊ शकत नाही. मला विचारले गेले कि आई आणि बाळ यातले कदाचित एकच वाचू शकेल तेव्हा कोणताही विचार न करता आम्ही आईला पहिला प्राधान्य द्यावे असे त्यांनी आमच्याकडून लेखी लिहून घेतले. दुसरा पर्याय ठेवला की आपण नॉर्मल डिलिव्हरी साठी प्रयत्न करू पण त्यात खूप जास्त लेबर पेन होईल, परंतु  त्यामध्ये सुद्धा पत्नीच्या व होणाऱ्या बाळाच्या जीवाला धोका आहेच. तेव्हा आम्ही हाथ जोडून डॉक्टरांना विनंती केली कि आईच्या जीवाला प्रथम प्राधान्य द्या आणि बाळालाही सुखरूप ठेवण्याचा प्रयत्न करा. सगळी जबाबदारी स्वीकारून त्यांना होकार दिला की डिलिव्हरी नॉर्मलच करूया. नंतर त्यानी प्लेट्सलेट्स, ब्लड आणि आरडीपी जिथे असेल तिथून घेऊन यायला सांगितले त्यावेळी आम्ही मुंबई ठाणे परिसर मध्ये जिथे मिळतील तिथून सर्व घेऊन आलो. नंतर त्यांनी एमआयसीयू या वॉर्ड मध्ये माझ्या पत्नीला  ऍडमिट केल आणि लेबर पेन साठी इंजेक्शन दिलं. लेबर पेन इतकं भयानक होतं की संपूर्ण एमआयसीयू मधील रुग्ण आणि त्यांचे  नातलग डॉक्टरांना सांगू लागले की, या ताईच लवकरच काहीतरी करा कारण तिला खूप त्रास होत होता परंतु डॉक्टरांनी मला क्लिअर सांगितलं, की तुम्ही बोलत असाल तर सिजर करू, पण सिजर मध्ये कोणाचीही गॅरंटी देता येणार नाही. जे पेन होईल ते तुम्हाला निमूटपणे सहन करावा लागेल. मी माझ्या पत्नीला सांगून धीर दिला की, आपल्याला बाळासाठी पेन सहन करायचाच आहे आणि तिने खरोखरच जीवापाड प्रयत्न केले. दोन दिवस पेन सहन करतच होते. माझी बहीण, माझे सर्व भाऊ हे सगळे सोबतच होते. कोणालाही काही समजत नव्हतं. ६ तारखेची पहाट झाली. घड्याळात सकाळी ७.३० वाजले असतील आणि त्यावेळी माझी पत्नी खूप जोरात किंचाळी मारू लागली. खूप जोरात पेन होत होत त्यावेळी तिच्यासोबत माझी बहीण उभी होती.  बहिणीला सुद्धा खूपच असाहाय्य झालं आणि त्यामुळे तिनी तेजस्विनी च्या भावाला बाहेरून बोलावून डॉक्टारांना बघायला सांगितलं. तिचा भाऊ डॉक्टरांना बघायला गेला इतक्यात माझी पत्नी जोरात ओरडली की बाळ बाहेर आल… बाळ बाहेर आल…  हे ऐकून माझी बहीण खूप घाबरली आणि तिने चादर थोडीशी वर करून पहिली, तर तिला बाळाचं डोकं बाहेर आलेलं दिसलं आणि ती डॉक्टरांना जोरात आवाज देऊ लागली. ऑन ड्युटी डॉक्टर प्रथमेश निवांत एका खुर्ची वर बसून टेबल वर डोकं टाकून झोपला होता. जोरात ओरडल्यानंतर तो उठला आणि पत्नी जवळ आला. त्यांनी नॉर्मल कॅज्युअल ओके आहे असं केलं जसं की काही झालच नाही. नंतर त्यांनी आम्हाला बाहेर काढलं आणि एमआयसीयू वॉर्ड बंद केला.
ज्या डिलिव्हरी साठी आम्हाला सांगितलं गेलेलं कि डिलिव्हरी होताना आपल्याला प्लेट्सलेट्स आणि ब्लड सतत चढवत राहावं लागेल नाहीतर तुमचा पेशंट हातातून जाईल,अश्या क्रिटिकल परिस्तितीत एकही डॉक्टर अथवा नर्स तिथे उपस्थित नव्हते. आमच्या सोबत अशी वागणूक केली ना तिथे प्लेट्सलेट्स होते ना ब्लड होते, मग अश्या परिस्तितीत जर कोणाला काही झालं असत तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? कारण माझ्याकडून त्यानी सर्व ठिकाणी सही घेऊन स्वतः मात्र सेफ झालेले होते. हे असे हॉस्पिटल आहे का जिथे रुग्णांना वाचवण्या ऐवजी डॉक्टर यातून कसे सुरक्षित बाहेर पडू शकतील याकडे डॉक्टरांचं जास्त लक्ष होत.
एका गर्भवती महिलेसोबत एका नामांकित सरकारी हॉस्पिटलमध्ये एका अत्यंत संवेदनशील वॉर्ड एमआयसीयू वॉर्ड मध्ये डॉक्टरांचं लक्ष नाही, डिलेव्हरी साठी आम्ही आणलेले प्लेट्सलेट्स आणि ब्लड सेटअप केलेलं नव्हतं, डॉक्टर झोपलेले होते, पडदे सगळे उघडे होते, वर सी सी टीव्ही कॅमेरा सुरु होता, आजूबाजूचे पेशंट व त्याचे नातेवाईक डिलिव्हरी झाली तेव्हा पाहत होते, हा एका महिलेवर सरळ सरळ अन्याय असून तिच्या चरित्राबरोबर खेळ झालेला आहे आणि तो तुम्ही चौकशी करून पाहू शकता. जर सी सी टीव्ही कॅमेरा आपल्याला मिळाला तर ६ तारखेला सकाळी ७.४० मिनिटानंतर जे काही २० मिनिट घडलं ते तुम्हाला सुद्धा पाहून धक्काच बसेल यात काही शंका नाही.
थोडक्यात महत्वाचं म्हणजे डिलीव्हरी झाल्यावर पोटातली जी काही घाण बाळासोबत बाहेर येते ती साफ करण्याचीही जबाबदारी स्टाफ ने दाखवली नाही माझी पत्नी तशीच लोळत पडली होती तेव्हा माझी बहीण आत गेली आणि सर्व बेड ची साफ सफाई केली आणि मला यातलं काहीही माहित नव्हत कारण मी बाळासोबत वॉर्ड नंबर ४० मध्ये होतो तेव्हा तिथे एक नर्स निर्लाज्जासारखी येऊन मला म्हणाली कि काय हो तुम्ही इथे आहात आणि मी एकटीने तिथे तुमच्या पत्नीची पूर्ण साफसफाई केली मला काहीतरी बक्षीस द्या तेव्हा मी तिला १०००/- रुपये दिले. ह्याला तुम्ही हॉस्पिटल म्हणता जिथे माणुसकी कोणाला माहीतच नाही आणि तुम्हाला फक्त त्रास आणि त्रासच दिला जातो.
ते होत नाही तेच आम्ही एमआयसीयू वॉर्ड बाहेर वाट बघत उभे होतो, तोच एमआयसीयू चा दरवाजा उघडला आणि एक वॉर्ड बॉय त्याच्या हातामध्ये एक ट्रे होता आणि ट्रेमध्ये बाळ होतं आणि बाळाला थोपटत तो धावत बाहेर आला. त्याने तेजस्विनी अशी जोरात हाक मारली आणि तो धावत सुटला.  त्याच्या मागे मी, माझे २ भाऊ, माझी बहीण, माझी वहिनी आम्ही सगळे वेड्यासारखे धावत सुटलो. काहीही कळत नव्हतं काय सुरु आहे ते, अक्षरशः हार्ट अटॅक यायचाच बाकी होता. एमआयसीयू हा वॉर्ड २ ऱ्या मजल्यावर होता आणि लेबर वॉर्ड नं ४० हा तळ मजल्यावर होता. २ ऱ्या मजल्यापासून ते तळ मजला ४० नंबर वॉर्ड पर्यंत तो वॉर्ड बॉय लोकांना बाजूला करत करत त्यातून रस्ता काढत बाबुला हलवत धावत होता, तेसुद्धा २ माजले जिन्याने उताराला. आम्ही त्याच्या मागे धावत सुटलो जेमतेम तीन ते चार मिनिट आम्ही धावतच होतो. त्यानंतर आम्ही ४०  नंबर वार्ड मध्ये गेलो आणि त्यांनी बाळाला ठेवल. मला आत मध्ये बोलावलं. मी रडत होतो.  मला फक्त मुलगा आहे की मुलगी इतकच दाखवलं. महत्वाचं म्हंणजे हे सगळं धावाधाव कशासाठी तर काचेच्या पेटीत लवकर बाळाला ठेवण्यासाठी आणि इथे पोहोचल्यावर कळलं कि तीच काचेची पेटी इथून निघाली आहे आणि ती दुसऱ्या मजल्यावर पोहोचली आहे. मग त्यानी परत धावत जाऊन पेटी घेऊन आले आणि नंतर बाळाला पेटीत ठेवल. सर इतका हलगर्जीपणा कसा करू शकतात. म्हणजे तुम्ही सर्व जबाबदारी आमच्यावर ढकलून त्यावर आमच्या सहया घेतल्या त्याचा अर्थ आता तुम्ही काहीही करायला मोकळे झालात असाच आहे. (याची शहानिशा तुम्ही तुमच्या पद्धतीने चेक करून घेऊ शकता)
त्यावेळी माझी परिस्थिती खूप भयानक होती. त्यानंतर ४० नंबर वार्ड मधून असं सांगितलं की तुम्हाला बाळा सोबतच राहायचंय कारण तुमच्या खूप सह्या आम्हाला घ्यायच्या आहेत. त्यामुळे मी बाळाला सोडून जाऊ शकत नव्हतो. अक्षरशः माझं हृदय फाटल होत. त्यानंतर त्यांनी माझी सही, कन्सेंट घेतली आणि मला नवीन बिल्डिंगमध्ये दहाव्या मजल्यावर घेऊन गेले. दहाव्या मजल्यावर घेऊन गेल्यावर त्यांनी बाळाच्या रूममध्ये म्हणजे एनआईसीयू वॉर्ड मध्ये ठेवलं आणि मला बाहेर काढून माझी सही घेतली. नंतर मला सांगितलं गेलं की आता तुम्ही बाळाला भेटू शकत नाही जोपर्यंत इथे एक तुम्ही बाई घेऊन येत नाही. ती बाई आता आतमध्ये कायमची बाबू सोबत राहील बाकी बाबुला कोणी बघू शकत नाही. हे अगोदर मला सांगितलं गेलं असतं तर मी अगोदर सर्व तयारी करून ठेवली असती. परंतु अचानक अशा परिस्थितीमध्ये काय करणार. शेवटी माझ्या पत्नीची आई तयार झाली की मी आत मध्ये राहते. बाबूची औषध आईचे औषध आईचे कपडे हे सगळे अरेंज करून आईला बाबू सोबत ठेवलं आणि नंतर मी धावतच खाली आलो. जेव्हा पत्नीला पाहिलं तेव्हा खूप बरं वाटलं कारण तिने डोळे उघडले आणि हसली. माझ्या जीवात जीव आला. जेव्हा मी आनंदाने तिला सांगितलं कि आपल्याला बाबू झालाय. त्यानंतर ती खूपच आनंदी झाली कारण १० वर्षानंतर आम्हाला आमचा बाळ झाला होता.
पत्नीशी बोलत नाही तोच एक डॉक्टर आले आणि लगेचच अडीच वाजता मला कॅन्सर डिपार्टमेंटमध्ये १० व्या मजल्यावर वॉर्ड नं ४२ मध्ये मिटींगला बोलावलं. मला सांगितलं गेलं की आजच्या आज आपल्याला कँसर ची ट्रीटमेंट सुरू करावी लागेल त्यासाठी बोन मॅरो करावा लागेल. म्हणजे तिच्या पाठीच्या कण्यामध्ये इंजेक्शन मारून त्यातलं पाणी टेस्टिंगला पाठवावं लागेल. तर मी त्यांना विनंती केली की मॅडम आताच डिलिव्हरी झाली आहे, थोडे दिवस रेस्ट करू द्या त्यानंतर आपण हे सर्व करूया.  परंतु त्यांनी सरळ भाषेत सांगितलं की तुम्हाला जर आता करायचं असेल तर आम्ही करणार नाहीतर मग तुम्ही तुमचं डिसिशन घेऊ शकता आणि तिला नेऊ शकता. असं सुद्धा सांगितलं की जेमतेम तीन चार तासांमध्ये तिचा मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे मी अजूनच घाबरलो मग पुढचा प्रश्न होता की खर्च किती येईल? मग त्यांना विचारलं खर्च किती येईल, तर त्यांनी सांगितलं की या ट्रीटमेंटला अंदाजानं ३० ते ४० लाखाचा खर्च येऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्तही होऊ शकतो. पण आपल्याकडे जननी सुरक्षा योजना आहे. त्या योजनेमध्ये प्रेग्नेंट बाईच्या डिलिव्हरी झाल्यानंतर ४२ दिवसापर्यंत ची सर्व ट्रीटमेंट चा खर्च या योजनेत सेंट्रल गव्हर्मेंट करते आणि ४२ दिवसानंतर जर आपल्याला थांबावं लागलं तर राजीव गांधी योजना जी ५ लाखापर्यंत आपल्याला औषधासाठी मदत करू शकेल.  त्यामुळे मी फंड आणि औषध याच्या बाबतीत थोडासा रिलॅक्स झालो.
मग त्या दिवशी संध्याकाळी पुन्हा त्याचा कॉल आला आणि विचारलं कि तुमचा रिप्लाय आता हवा आहे. मग मी घाबरत घाबरत त्यांना सांगितलं कि बोन मॅरो साठी मी तयार आहे. लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची टीम वॉर्ड मध्ये आली आणि माझ्या पत्नीला कँसर बद्दल सर्व सांगायला लागली तेव्हा मी त्यांना विनंती केली कि तिला यातलं काही सांगू नका, नाहीतर ती सहन नाही करणार. परंतु त्यांनी सांगितलं कि इथला आमचा नियम आहे कि आम्ही पेशंट ला कॅन्सर बद्दल सर्व सांगितल्या शिवाय आम्ही ट्रीटमेंट सुरु करू शकत नाही. त्यानी तिला सर्व सांगून मोकळे झाले, त्यामुळे ती तिथेच खचून गेली. मग माझ्या पत्नीला आम्ही १० व्या मजल्यावर घेऊन गेलो त्यासाठीही त्याचा कोणीही वॉर्डबॉय ते देत नाहीत. स्ट्रेचर विलचेअर आपल्यालाच घेऊन जायचं असत.  नंतर तिच्यावर बोन मॅरो टेस्ट केली गेली. खूप ओरडली ती कारण आदल्या दिवशीच डिलेव्हरी झाली होती. त्यानंतर आम्ही त्यांना घेऊन पुन्हा एमआयसीयू वॉर्ड मध्ये आलो. आम्हाला सांगितलं कि हा रिपोर्ट १७-१८ दिवसानंतर येतो. दुसऱ्याच दिवशी डॉक्टर कल्पिता वॉर्ड मध्ये आली आणि आम्हाला सांगितलं की आपल्याला कीमोचे मिनी डोस द्यावे लागतील. तेव्हा मी त्यांना म्हटलं की अजून रिपोर्ट आला नाही तर तुम्ही कशासाठी किमो देत आहात. त्यावर उद्धटपणे म्हणाली कि आम्हाला माहिती आहे रिपोर्ट मध्ये काय येणार आहे तसेच 100% तुम्हाला कॅन्सर झालेलाच आहे ते सुद्धा थर्ड ते फोर्थ स्टेज चा कॅन्सर आहे. आतापासूनच तुम्हाला ट्रीटमेंट सुरू करावीच लागेल नाहीतर एका दिवसात ही तिचा जीव जाऊ शकतो. त्यावेळी मी घाबरलेलो असल्यामुळे त्या पेपरवर सही केली आणि त्यांनी मिनी किमो सुरू केले जे गोळ्यांच्या मार्फत दिले जातात. पहिल्या दिवसापासून प्लेट्सलेट्स आणि ब्लड हे सुरूच होते त्यामुळे आम्हाला ते आणायला जे जे, सायन हॉस्पिटल आणि बरेच ब्लड बँक इथे जाऊन ब्लड आणि प्लेटलेट्स रोजच्या रोज आणावे लागत होते. त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतच होतो परंतु खर्च खूप झाला होता म्हणून मी डॉक्टर चंद्रलेखा (HOD) याना विनंती केली कि आपण सांगितल्याप्रमाणे पुढचा खर्च हा योजनेंमार्फत करूया.
मग आम्ही जननी सुरक्षा योजनेसाठी सर्व तयारी करून योजना सुरु केली. मला औषधांची लिस्ट देण्यात आली आणि ती घेऊन मी सर्व ठिकाणचे अप्रूव्हल घेऊन शेवटी डीन कडे गेलो. मला त्यांची सही घेऊन ती औषध घेऊन यायची होती पण जेव्हा डीन कडे गेलो तेव्हा त्याच्या डिपार्टमेंट मधून नेहा मॅडम ने मला सांगितलं की, या योजनेअंतर्गत सरकारने फंड दिलेला नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही औषध या योजनेअंतर्गत मिळू शकत नाहीत. तिथेच माझे पाय लटपटायला लागले. पण त्यांनी सांगितलं कि डॉक्टर कडे जाऊन कॉस्ट सर्टिफिकेट घेऊन या, तुमची केस खूप क्रिटिकल आहे. आपण तुमच्यासाठी काहीतरी करूया. मग मी पुन्हा डॉक्टर कल्पिता कडे गेलो आणि सर्व माहिती सांगितली. तेव्हा तिने उद्धटपणे सांगितलं कि कॉस्ट सर्टिफिकेट तुम्हाला १-२ आठवड्यात सुद्धा मिळू शकत नाही आणि आता हि योजना आपण करू शकत नाही. तुमची औषधे तुम्हाला स्वतः विकत घ्यावीच लागणार. ती तुम्ही कुठूनही आणि कशीही आणा आम्हाला औषध हवे आहे. त्यामुळे माझी पुन्हा पायाखालची जमीन सरकली. मग मी त्यांना पुन्हा विनंती केली की दुसरा काही मार्ग असेल तर सांगा कारण माझ्याजवळ इतके पैसे नाहीत.  मग त्यांनी सांगितलं की आपण राजीव गांधी योजना चालू करूया. लगेचच मी राजीव गांधी योजना फॉर्म भरला आणि संपूर्ण दिवस मी त्या योजना लागू करण्याच्या मागे फिरत होतो. शेवटी माझी राजीव गांधी योजना ऍक्टिव्ह झाली. लगेचच दुसऱ्या दिवशी त्यानी मला औषधाची लिस्ट दिली. मी जेव्हा औषध आणायला गेलो तेव्हा त्याचा मेडिकल स्टॉक पर्सन म्हणाला कि हि औषध गेल्या १ ते २ महिन्यांपासून स्टॉक मध्ये नाही आहेत आणि पुढे सुद्धा २ महिने स्टॉक मध्ये येणार नाहीत. तेव्हा मला दुसरा झटका बसला. तसाच धावत धावत मी डॉक्टर कल्पिता जवळ जाऊन सर्व प्रकार सांगितला त्यावेळी कल्पिता रागाने बोलली डॉक्टर बोलली कि औषध आणण्याचं काम तुमचं आहे माझं नाही तेव्हा तुम्ही ती औषध कुठूनही आणा. मी त्यांच्या हाता पाया जोडल्या की काहीतरी करा खरंच एवढा खर्च मी नाही करू शकत. आजून काही असेल ते सुद्धा मी करायला तयार आहे, तेव्हा त्यानी मला अजून एक पर्याय सांगितला. कॅन्सर पेशंट्स एड अससोसिएशन या संस्थेचा फॉर्म भरायला सांगून त्यासोबत कॉस्ट सर्टिफिकेट दिल. कॉस्ट सर्टिफिकेट मध्ये त्यांनी २ वर्षासाठी रु.४,५४,०००/- साठी विनंती केली होती. त्याच्या हाजीअली येथील ऑफिस मध्ये जाऊन मान्यता घेऊन यायची होती. तसाच मी निघालो आणि ऑफिस मध्ये पोहोचलो तर त्यांनी रु.१,४५,०००/- इतकीच मान्यता दिली आणि सांगितलं कि त्याच्या दुकानात जाऊन औषध घ्या. मग मी तसाच औषधाच्या दुकानात गेलो आणि बघतो तर काय त्यांनी सांगितलं कि तुम्हाला फक्त रु.२०,०००/- चिच औषध मिळतील (हा कोणता व्यवहार आहे कळलं नाही याची सुद्धा चौकशी करावी हि नम्र विनंती.  हा एक भ्रस्टाचार दिसत आहे कारण रु १,४५,०००/- अँप्रोवल आलं असताना फक्त रु २०,०००/- चीच औषध दिली ती सुद्धा बिल न देता) मग मी फक्त १ इंजेक्शन घेऊन आलो. जेव्हा हे मी डॉक्टर कल्पिता ना सांगितलं तेव्हा ती  पुन्हा रागातच म्हणाली कि आता आम्ही काहीही करू शकत नाही. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत औषध हवी आहेत, ती कशीहि घेऊन या नाहीतर तुमच्या पेशंटला काही दगाफटका झाला तर आमची जबाबदारी नाही आणि त्यावर सुद्धा त्यानी लिहून माझी सही घेतली आणि ते मोकळे झाले.
त्यानंतर १७ तारखेला रात्री ८ नंतर अचानक येऊन आमच्या नकळत त्यानी मोठा किमो चा डोस लावला ज्यामुळे माझ्या पत्नीला चक्कर आणि हातापायाला मुंग्या यायला लागल्या. आम्हाला सुरवातीला सांगितलं गेलं होत कि जोपर्यंत बोन मॅरो चा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही मिनी किमो च लावणार मग अचानक असं काय झालं कि तुम्ही न सांगता मोठा डोस लावला. जेव्हा मी त्यांना विचारायला गेलो तेव्हा त्यानी डॉक्टर कल्पिता ने मला ओरडत सांगितलं कि आम्ही तुमच्या याबाबत सर्व कंसेन्ट सह्या घेतल्या आहेत तेव्हा आम्ही कोणती ट्रीटमेंट देणार आहे हे कोणाला विचारायची आम्हाला गरज वाटत नाही. त्यानंतर मग मी खूप घाबरलो ह्या सर्वानी माझ्याकडून आजून कोणत्या कोणत्या नियमावली वर सह्या करून घेतल्या आहेत तेच मला आठवत नव्हतं.
त्यानंतर माझ्याकडे काहीच पर्याय उरले नाही आणि शेवटी नाईलाजास्तव मला माझ्या पत्नीला १८ जानेवारी २०२५ रोजी घरी घेऊन यावं लागलं. घरी आल्यावर आम्ही पहिल्यांदा आमच्या बाळाला पाहिलं आणि रडलो. त्यानंतर ५ दिवसानंतर तिच्या पोटात दुखू लागलं आणि जुलाब सुरु झाले. शेवटी तिला हार्ट अटॅक आला आणि ती आम्हाला कायमची सोडून देवाघरी गेली. आता माझ्या सोबत १ महिन्याचं  बाळ आहे तो सुद्धा प्रीमॅच्युअर असल्या कारणामुळे त्याची सतत काहींना काही टेस्ट चेक अप सुरु आहे. आता आम्हाला असच पुढे कायमच दुःख सोबतीला घेऊन आयुष्य काढायचं आहे.
त्याच दरम्यान एन आई सी यु मध्ये मला एकदा अचानक बोलावलं गेलं आणि सांगितलं कि बाळाचे हार्ट बिट्स स्लो झालेत तर आम्ही एक इंजेक्शन देणार आहोत त्याने हार्ट बिट्स नॉर्मल होतील अन्यथा हार्ट बिट्स बंद पण होतील तर ते इंजेक्शन द्यायचं कि नाही तुमच्यावर आहे त्यावेळी मी खूप घाबरलो पण काहीही पर्याय नव्हता म्हणून मी हो म्हणालो तेव्हा सुद्धा माझ्याकडून लिहून घेतलं कि जर काही दगाफटका झाला तर तुमची जबाबदारी.
इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जर कोणालाच कोणतीच जबाबदारी घ्यायची नाही आहे तर मग कश्याला आम्हाला त्रास देता आम्ही जे काही असेल ते घरीच उपचार करू. डॉक्टरांना पूर्वी देव मानत होते पण आता तर माणूस सोडा राक्षस झालेत असंच मला तरी दिसले आहेत.
आम्हाला कोणकोणत्या गोष्टीचा त्रास झाला हे थोडक्यात सांगतो :-
• ऍडमिशन च्या वेळेला इतकं घाबरावयाच कारण काय होत आणि सिझर आणि नॉर्मल डिलिव्हरी याबद्दल कशासाठी घाबरवलं? कारण जेव्हा डिलेव्हरी झाली तेव्हा डॉक्टर जवळ नव्हते, ऑन ड्युटी डॉक्टर प्रथमेश झोपलेले होते. तेव्हा जर माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला काही झालं असत तर ती जबाबदारी पूर्णतः माझी होती का? कारण तुम्ही माझ्याकडून सर्व सहया घेतल्या होत्या ज्यामुळे तुम्ही सर्व सुरक्षित होता ?
• लेबर पेन च इंजेक्शन दिल तेव्हापासून डिलेव्हरी होईपर्यंत पेशंट ची काळजी घेण्याचं काम कोणाचं होतं?
• लेबर रूम मध्ये डिलेव्हरी का नाही झाली? आणि डिलेव्हरी झाली तेव्हा काचेची पेटी जवळ का नव्हती ? मग तुम्ही नक्की कोणती ट्रीटमेंट करत होता?
• मुलाला जन्म झाल्यानंतर धावत पळत नेण्याची पद्धत कितपत योग्य ? धावता धावता जर वॉर्ड बॉय धडपडला असता तर कोणाची जबाबदारी होती ?
• वॉर्ड मध्ये एका महिलेची डिलेव्हरी होताना आजूबाजूचे पेशंट व त्याचे नातेवाईक हे सुद्धा डिलेव्हरी पाहत होते मग तुमचा महिला सन्मान कुठे गेला? त्यापेक्षा घरीच डिलेव्हरी झालेली काय वाईट?
• डिलेव्हरी झाल्यानंतर पोटातली जी घाण बाहेर पडते ती साफ करण्याची जबादारी नातेवाईकांवर का टाकली गेली? त्यातून जर इन्फेक्शन झालं असत तर त्याची जबाबदारी कोणाची? रक्ताने माखलेल्या चादरीवर पेशंट ला २ दिवस झोपवणे कितपत योग्य?
• कॅन्सर चे सिम्प्टम झालेल्या पेशंटला त्याला कॅन्सर झालेला आहे आणि त्याला कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट करणार आहे हे तुम्ही टेस्ट चे रिपोर्ट येण्याआधी कसे काय सांगू शकता?
• महिला पेशंटला जागेवर म्हणजे २ बेड च्या मध्ये टप ठेऊन अंघोळ करायला डॉक्टर कल्पिता यांची जबरदस्ती करणे कितपत योग्य होते आणि ते हि एमआईसीयू मध्ये ? आम्ही नकार दिल्यावर आमच्यावर जबरदस्ती पद्धतीने हे झालच पाहिजे असं स्वतः महिला असलेल्या डॉक्टर कल्पिता कसे सांगू शकतात ? महिलांचा काही मान सन्मान ठेवण्याची पद्धती बंद झाल्या आहेत का?
• बोन मॅरो इतका उर्जेन्ट होता का जो डिलेव्हरी च्या दिवशीच करायचा होता नाहीतर तिचा जीव जाऊ शकतो?
• किमो थिरपी कोणत्या आधारावर लावला गेला कारण रिपोर्ट तर १७-१८ दिवसानंतर येणार होता?
• प्लेट्सलेट्स मुळे जेव्हा अंगावर रिअक्शन झाले तेव्हा इंजेकशन मारायचं होत. १५ मिनिट इंजक्शन शोधत बसला होतात आणि जेव्हा आम्ही विचारायला गेलो तेव्हा आम्हाला सांगितलं कि तुम्ही बाहेरून विकत घेऊन या कारण इथे आम्हाला ते  भेटत नाही आहे शिवाय भेटलं तरी ते खूप जून असणार आहे. नंतर आम्ही ते स्वतः विकत घेऊन आलो त्यानंतर ते इंजेक्शन दिल गेलं याचा अर्थ आम्ही काय समजायचं ? नक्की ट्रीटमेंट करत होता कि मस्करी?
• दुसऱ्यांच्या ब्लड टेस्ट करायला आमच्या पेशंट च ब्लड दिल गेलं आणि आमच्या टेस्ट सोबत दुसऱ्याचं ब्लड टेस्ट साठी पाठवलं गेलं म्हणजे एकाचा रिपोर्ट दुसऱ्याला मग तुम्ही कोणाची ट्रीटमेंट कोणालाही सुरु करणार का? किती भयंकर प्रकार आहे हा तुम्ही आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ करत आहेत पण आम्ही पेशंट तुमच्या ताब्यात असल्याकारणाने घाबरून गप्प बसतो म्हणून तुम्ही जास्त शेफारता.
• युरिक ऍसिड टेस्ट साठी डॉक्टर कल्पिता यांनी लॅबोरेटरी मध्ये युरीन पाठवली, आम्ही तिथे घेऊन गेले असता त्यांनी ओरडून सांगितले मूर्ख आहात का? ज्यासाठी रक्त लागत त्या टेस्ट साठी तुम्ही युरीन आणता. हे सर्व डॉक्टर कल्पिता च्या हलगर्जी पणा मुळे होत होते.
• जननी सुरक्षा योजना आणि राजीव गांधी योजना ऍक्टिव्ह करून सुद्धा आम्हाला त्या योजनेमार्फत कोणतीच औषध दिली नाही आणि त्यामुळे मला पत्नी ला घेऊन घरी यावं लागलं आणि शेवटी आम्हाला तिला गमवावं लागलं.याला जबाबदार कोण?
• जेव्हा सर्व योजनांची दारे आमच्यासाठी बंद झाली आणि सर्व औषधाची मागणी आमच्याकडून केली त्यावेळी आम्ही थोडी थोडी औषधे आणून देतो म्हणालो तेव्हा डॉक्टर कल्पिता ने आम्हाला जोपर्यंत संपूर्ण १४ इंजेक्शन आणून देत नाही तोपर्यंत आम्ही एकही इंजेक्शन लावणार नाही असे सांगितले. ट्रस्ट मार्फत आम्ही २ इंजेक्शन आणून दिले परंतु त्यांना १४ इंजेक्शन एकत्र हवे होते म्हणून त्यांनी ते २ इंजेक्शन लावले नाही आणि जेव्हा आम्ही डिस्चार्ज घेतला तेव्हा ती औषधे त्यानी त्याच्याच जवळ ठेवली.
• कॅन्सर वॉर्ड नं  ४२ मध्ये इतका त्रास दिला जातो कि पेशंट तर सोडा त्यांचे नातलग सुद्धा आजारी पडतील अशी व्यवस्था केली गेलेली आहे. नातलगांचा अपमान केला गेला व वयोवृद्ध माणसांना लंगडे पांगळे म्हणून हिनवले गेले हे डॉक्टर कल्पिता यांचे वागणे कितपत माणुसकीला धरून होते?
• कॅन्सर वॉर्ड नं  ४२ बाहेर जर आपण बसलात तर बोन मॅरो ची मार्केटिंग सुरु असल्याचे दिसून येईल, काहींना ११०००/- काहींना २५०००/- काहींना ३५०००/- काहींना ४२,०००/- आणि आम्ही स्वतः ३२००० भरले आहेत त्याची कोणतीही पावती दिली जात नाही हे कितपत योग्य आहे.
• डॉक्टर राकेश याना पेशंट च्या प्रकृती बद्दल विचारले असता आम्हाला सांगितले कि तुमची आणि माझ्या पत्नीची १५-२० माणसे घेऊन या आम्ही एकदाच सगळं सांगणार परत परत विचारू नका आणि आलेल्या प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे  असे डॉक्टर राकेश यांनी धमकावले. रक्तदानासाठी बळजबरी करणे अथवा धमकावणे हे योग्य आहे का?
• प्रकृती बद्दल विचारायला जेम तेम ७-८ दिवसानंतर जेव्हा आमच्या घरातली वडीलधारी मंडळी आली तेव्हा त्यांनी आम्हाला एका रूम मध्ये घेऊन गेले आणि डॉक्टर कल्पिता यांनी स्वतःच्या मोबाईलवर कदाचित डॉक्टर रिझवानच्या मोबाईलवर आमची मीटिंग ची संपूर्ण विडिओ रेकॉर्डिंग केली गेली. पेशंट आणि डॉक्टर यांच्यातली गोपनीयता डावलली गेली. हे डॉक्टरी पेंश्याला अशोभनीय गोष्ट आहे आणि याचा आम्ही निःशेष करतो. (ती विडिओ रेकॉर्डिंग आपण डॉक्टर कल्पिता किव्हा डॉक्टर रिझवानच्या मोबाईल मधून घेऊन ती पाहावी)
• आमच्या पेशंट ची फाईल आम्हीच तयार करायची त्यात आम्हीच डोकमेंट्स, पेपर, रिपोर्ट लावायचे, जेव्हा डॉक्टर रिपोर्ट मागतात तेव्हा आम्हीच त्यात शोधून द्यायचे, डॉक्टर औषध लिहून द्यायचे ते आम्हीच नाव लिहून फ्रिज मध्ये ठेवायचे आणि डॉक्टर जेव्हा मागतील तेव्हा आम्हीच त्यांना सर्व काढून द्यायचं, त्यात कोणते औषध आमच्या पेशंटला लावले ते कळायला कोणताच मार्ग नाही.
• ब्लड कँसर सारखं एक मोठा विभाग चालवत असताना तुम्ही पेशंट ला माहिती देत असताना ज्या संबंधित योजना सुरु आहेत कि बंद आहेत हे माहित नसेल शिवाय आपल्या हॉस्पिटलमध्ये जर त्या विभागासाठी लागणारी औषध उपलब्धच नसतील तर मग असे विभाग सुरु ठेऊन जनतेच्या जीवाशी खेळण्याचा तुम्हाला अधिकार आहे कि नाही हे तुम्हीच ठरवा.
• पेशंट म्हणजे या विभागासाठी खेळणी आहेत का? हे डॉक्टर त्यांना खेळणं समजून त्याच्या जीवाशी खेळत असतात.
हॉस्पिटलच्या जाचाला अक्षरशः कंटाळून आम्ही घरी जाण्याचा निर्णय घेतला पण ह्याच निर्णयामुळे मला माझ्या पत्नीला कायमच गमवावं लागलं. माझ जे  वैयक्तिक नुकसान झालेलं आहे ते मी आयुष्यात कधीही भरू शकत नाही याची कायम खंत राहील.
आपल्याला हि नम्र विनंती आहे कि माझ्या देवाघरी गेलेल्या पत्नीला, माझ्या २० दिवसांच्या बाळाला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला झालेल्या प्रत्येक छळाला योग्य तो न्याय द्यावा. एमआईसीयू वॉर्ड आणि ४० नंबर  लेबर वॉर्ड  आणि ४२ नंबर ब्लड कॅन्सर वॉर्ड मधून जे काही घडलं त्याबद्दल आम्हाला रीतसर लेखी माफीनामा द्यावा हीच माझ्या पत्नीच्या पवित्र आत्म्यास माझ्याकडून खरी श्रद्धांजली असेल.
धन्यवाद
किरण नरेंद्र पाटील
मोबाइल – 9022883880

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here