नांदेडच्या आरोग्यसेवेला नवी बळकटी; वाडी बुद्रुकमध्ये १०० खाटांचं सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय — मंत्री उदय सामंत यांची पाहणी
*नांदेड, ता. वाडी बुद्रुक, दि. ८ —*
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांनी नांदेड जिल्ह्यातील वाडी बुद्रुक येथील नवनिर्मित उपजिल्हा रुग्णालयाला आज भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली.
सुमारे ५ एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय सोयीसुविधा, बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नांदेड आणि परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे.
या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आमदार बालाजी कल्याणकर यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न केले. काल (७ नोव्हेंबर) शिंदे साहेबांच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला उपचारांसाठी दूरवर जावं लागू नये, वेळेत वैद्यकीय मदत मिळावी आणि आर्थिक परिस्थितीमुळे कुणीही आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये, हीच आमची भावना आहे, असे यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले.
या प्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार हेमंत पाटील यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
*#WadiBudruk #NandedHealth #100BedHospital #UdaySamant #BalajiKalyankar #EknathShinde #SubDistrictHospital #Nanded*
—
*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | https://maimedia24.com*
























