Home मुंबई *‘चित्रपताका’ची प्रेक्षक नोंदणी सुरू; नोंदणी शुल्कातून संकलित महसूल दुष्काळ निवारणासाठी!*

*‘चित्रपताका’ची प्रेक्षक नोंदणी सुरू; नोंदणी शुल्कातून संकलित महसूल दुष्काळ निवारणासाठी!*

6
0

*‘चित्रपताका’ची प्रेक्षक नोंदणी सुरू; नोंदणी शुल्कातून संकलित महसूल दुष्काळ निवारणासाठी!*

*सब हेड:*
*महोत्सवातून जमा होणारे उत्पन्न मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले जाणार*

*मुंबई, दि. ७ नोव्हेंबर २०२६ -*

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत यंदाचा ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. मराठीतील समकालीन आशयघन चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी देतानाच दुष्काळ निवारण कार्यातही खारीचा वाटा उचलण्याचा महोत्सवाचा प्रयत्न आहे.

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी चार दिवसांचे केवळ १०० रुपये नाममात्र नोंदणी शुल्क आकारण्यात येणार असून, या माध्यमातून जमा होणारा संपूर्ण महसूल दुष्काळ निवारण कार्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने *१५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात* ‘चित्रपताका’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या चार दिवसीय महोत्सवात सुमारे *३५ मराठी चित्रपटांचे प्रदर्शन, सात परिसंवाद, चार विशेष मुलाखती, सात कार्यशाळा* आणि विविध सिनेसांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चित्रपट रसिकांना अनुभवता येणार आहे. जुन्या गाजलेल्या चित्रपटांपासून नव्या आशयघन सिनेमांपर्यंतचा प्रवास या महोत्सवातून अनुभवता येणार आहे.

विशेष म्हणजे, आकारण्यात येणारे १०० रुपयांचे शुल्क केवळ प्रवेशाचे माध्यम नसून सामाजिक कार्यातील सहभागाचे प्रतीक ठरणार आहे. ही संपूर्ण रक्कम दुष्काळ निवारणासाठी देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री *ॲड. आशिष शेलार* यांच्या सूचनेनुसार घेतल्याची माहिती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक *स्वाती म्हसे-पाटील* यांनी दिली.

महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून, इच्छुकांनी *www.chitrapataka.com* या अधिकृत संकेतस्थळाला किंवा *https://tktplz.events/gject6-chitrapataka-marathi-film-festival* या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन म्हसे-पाटील यांनी केले आहे.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here