Home पुणे *पायल झांबरे प्रकरण फास्टट्रॅकवर आणणार — उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे आश्वासन — आईशी...

*पायल झांबरे प्रकरण फास्टट्रॅकवर आणणार — उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे आश्वासन — आईशी फोनवर संवाद*

10
0

> *पायल झांबरे प्रकरण फास्टट्रॅकवर आणणार — उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे आश्वासन — आईशी फोनवर संवाद*

*📰 पूर्ण बातमी:*

*पायल झांबरे प्रकरण फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार — सुनेत्रा पवार*

पुणे, ५ नोव्हेंबर — पायल झांबरे प्रकरणाचा तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहे.

आज सुनेत्रा पवार यांनी पायलच्या आईशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षकांशीही चर्चा केल्याचे सांगितले.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, “तुमच्या भावना मला समजू शकतात. मी सुद्धा एक आई आहे. अशा घटना घडायलाच नकोत, मात्र दुर्दैवाने ही घटना घडली आहे. या कठीण प्रसंगी तुमच्या वेदना मी समजू शकते,” अशा शब्दांत त्यांनी पायलच्या आईला धीर दिला.

या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आणि अधिक वेगाने व्हावा यासाठी प्रयत्न करणार असून, कुटुंबियांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

—
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here